Upcoming Movies

Movies Now Showing In Theatres

Photo Galleries

अभिनेत्री पूर्वी भावे आजवर तिच्या सोज्वळ आणि मराठमोळ्या लूकसाठी अनेकांना ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ वाटायची. पण पूर्वी भावे किती हॉट, सेक्सी, सल्ट्री, सेन्शुअस दिसू शकते, ते तिच्या सोशल मीडियावरून नुकत्याच रिविल झालेल्या ग्लॅमरस फोटोशूटवरून दिसून येतंय.

Marathi Actress Swapnali Patil Photoshoot in Maharashtrian Traditional Saree Look. Here are te Exclusive Photos.

Exclusive Photos of Marathi Actress 'Pooja Katurde' from her latest Photoshoot in glamorous look wearing a always reliable little black dress.

Manju - Shaunak Marriage Photos from serial Ti Phulrani.

Marathi film Luckee held its Mumbai premiere on Wednesday, 6th February at PVR Juhu. Film's cast, crew and celebrities from Marathi Film fraternity were present. Here are the photos from the premiere.

Exclusive Photos of Marathi Actress 'Pooja Katurde' from her latest Photoshoot in Bubbly look.

१ फेब्रुवारीला प्रदर्शित 'मी पण सचिन' चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा बुधवारी जुहूच्या सनी सुपर साउंड मध्ये संपन्न झाला. यावेळी मी पण सचिन चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव, चित्रपटातील कलाकार स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, कल्याणी मुळे, अनुजा साठे-गोखले, मृणाल जाधव यांच्यासह हेमंत ढोमे, मृण्मयी देशपांडे, समिधा गुरु, सौरभ गोखले, रीना अग्रवाल, सुयोग गोऱ्हे, स्वप्ना वाघमारे-जोशी हे कलाकार उपस्थित होते. शिवाय मी पण सचिन चित्रपटाचे निर्माते पुरुषोत्तम जाधव, संजय छाब्रिया, डॉक्टर लकडवला आदी मान्यवरांनी देखील या प्रीमियरला शो ला हजेरी लावली.

Actress Prajakta Mali is hosting the comedy show 'Maharashtrachi Hasya Jatra' on Sony Marathi. Here are the glamorous photos of Prajakta from the sets of the show.

Top Stories

Grid List

राहुल गौतम ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित 'तत्ताड' या आगामी चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मीडियाद्वारे नुकतंच लाँच करण्यात आलं. अत्यंत लक्षवेधी पोस्टर असलेल्या या चित्रपटातून एका वादकाची कथा पहायला मिळणार आहे.

झी युवावरील सूर राहू दे मधील प्रमुख भूमिका निभावणारा अभिनेता संग्राम साळवी आणि आम्ही दोघी मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हे दोघे गेल्यावर्षी लग्नबेडीत अडकले. खुशबू आणि संग्राम यांनी लग्न करून त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. ही दोघं म्हणजे चाहत्यांची आवडती जोडी आहे आणि ते नेहमीच या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करतात. व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजे प्रेमी युगुलांचा दिवस आणि नवीन लग्न झालेले खुशबू आणि संग्राम यांचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेन्टाईन्स डे पण तितकाच खास असेल यात शंकाच नाही.

शेतकऱ्यांचा आक्रोश मांडणारा, आणि आजच्या तरुण शेतकरीवर्गाला प्रेरणा देणाऱ्या 'आसूड' सिनेमाला ग्रामीण महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. एग्रीकल्चर शाखेत पदवी मिळवलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाला नागपूर, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या भागातील प्रेक्षकांनी चांगली साथ दिली आहे. खास करून, अभिनेता अमित्रियान पाटीलने साकारलेला 'शिवाजी पाटील' प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. शिवाय, राजकारणी डावपेच आणि हेवेदाव्यांचे चोख विश्लेषण या सिनेमात मांडले असल्याकारणामुळे हा सिनेमा सामान्यांच्या मनात थेट घर करण्यास यशस्वी होत आहे.

सरळ साधी राहणी पण उच्च विचार... आपण जे बनू शकलो नाही ते आपल्या मुलाने बनावं हे स्वप्न आणि पाटील म्हणजे नेमकं काय हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'पाटील' सिनेमा. प्रथम दिग्दर्शकीय पदार्पण करणाऱ्या संतोष राममीना मिजगर यांनी पाटील चित्रपटाची कथा पटकथा आणि संवादही लिहीले आहेत आणि त्यांनी शिवाजी पाटील ही मध्यवर्ती भुमिकाही साकारली आहे.

Gulabjaam is the first food film in Marathi and it works because it metaphors the Maharashtrian food into a beautiful simple story. Director Sachin Kundalkar has written Gulabjaam beautifully along with young writer Tejas Modak. It is a treat to watch mouth-watering Marathi cuisine on screen along with the simplicity of story-telling. Gulabjaam touches heart because it brings audience close to its traditional food and shows different shades of life.

Aapla Manus is a suspense thriller woven around the complexities of relationships, ideologies, generation gaps and modern lifestyle. Director Satish Rajwade has tried to portray the difficulties of senior persons and their degrading value in the family system through a detective's lens who has a soft corner for the elderly people.

अभिनेत्री अदिती द्रविडने व्हॅलेंटाईन्स डे’ निमीत्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ ह्या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती राधा बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसतेय.

कॉलेजगोईंग मित्रांची धमाल कथा असलेल्या 'आम्ही बेफिकर' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. उत्तम छायांकन, धमाल कथा आणि चटपटीत संवादांमुळे ८ मार्चला प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल.

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी चेतन गरुड प्रॉडक्शन्सची दिलखेच गाणी सध्या आबाल-वृद्धांच्याही ओठी रुळली आहेत. 'खंडेराया झाली माझी दैना' आणि 'सुरमई'ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चेतन गरुड आणखी एक हिट गाणं रसिक-प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेंनी आपल्या हटके अंदाजात गायलेल्या 'आली फुलवाली' या अल्बमलासुद्धा तरुणांनी डोक्यावर नाही घेतलं तरच नवल! चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्ट यांच्या संयुक्तविद्यमाने 'आली फुलवाली' हा सिंगल अल्बम वाजवा मराठी या युट्युब चॅनलवर झळकला.

Advertisement

Top Stories From Television & Theater

Grid List

शिक्षणामुळे जोडली गेलेली ‘ती फुलराणी’ मालिकेतील मंजू आणि शौनकची जोडी एकमेकांच्या सोबतीने त्यांच्यमध्ये निर्माण झालेले नवीन नाते अनुभवत आहेत. एकीकडे त्यांच्या नव्या नात्यात तयार झालेला गोडवा, प्रेमाच्या क्षणांचा आनंद दोघेही घेत आहेत तर दुसरीकडे देशमुख कुटुंबाकडून येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी ते दोघे एकमेकांचा आधारही बनले आहेत.

हिंदू साम्राज्याचा ध्यास घेऊन कायमच अपराजित राहिलेले सेनानायक, ज्यांनी युगपुरुष शिवाजी महाराजांचे हिंदू साम्राज्य प्रस्थापित करण्याचे स्वप्न बऱ्याच अंशी सत्यात उतरवले. दिल्लीत भगवा फडकावणारे पहिले मराठी सेनानी... शक्ती आणि बुद्धीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव पेशवे. त्यांच्या जीवनावर आधारित 'अजिंक्य योद्धा - श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ' या महानाट्याचा भव्य शुभारंभ अंधेरी येथील होली फॅमिली पटांगणात नुकताच झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे अध्यक्ष ॲड आशिष शेलार होते. या वेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अमित साटम, गायक नंदेश उमप, आदर्श शिंदे आदींची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर या खास प्रयोगासाठी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. या महानाट्याचे आयोजन केसरबेन मुरजी पटेल यांनी केले होते. अजिंक्य योद्ध्याचा इतिहास आणि कीर्ती अनुभवण्यासाठी या वेळी हजारोंनी रसिकवर्ग जमला होता.

Advertisement