महाराष्ट्राचे महागुरू हे विविध कलेमध्ये पारंगत आहेत हे साऱ्यांना माहितच आहे. अभिनय, नृत्य, संगीत आदी कलांमध्ये आपला ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. गेली ३ दशके रसिकांना विविध माध्यमातून मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर यांची एनर्जी आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे. असाच किस्सा घडला सोहळा या चित्रपटाच्या शुट दरम्यान. या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सचिन पिळगावकर यांच्या शिस्तीविषयी एक नवी ओळख करून दिले.

मराठी भाषेचा ‘उंबरठा’ ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ३२व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार २०१८’ हा स्मिता पाटील यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व ४० वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार २०१८’ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

मराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती आहे, हे आता जगजाहीर झालं आहे. रणवीरदेखील आपल्या या ग्लॅमरस चाहतीला दरवेळी काही न काही सरप्राईज देताना आपल्याला दिसून येतो. मात्र, त्याने यावेळी अमृताला दिलेलं सरप्राईज या सर्वांहून हटके आहे. कारण, आपापल्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे या दोघांना प्रत्यक्षात भेटणं शक्य नव्हतं, पण रणवीरने वेळात वेळ काढत अमृताच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिची भेट घेतली. रणवीरचे हे सरप्राईज व्हिजिट अमृतासाठी आनंदाचा मोठा धक्काच ठरला!

अभिनेत्री सैयामी खेर ने हिंदी चित्रपटसृष्टित दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट मिर्ज़ियाँ मधून धमाकेदार पदार्पण केले. ह्या चित्रपटानंतर ही हुन्नरी अभिनेत्री रितेश देशमुख अभिनीत आगामी मराठी चित्रपट "माऊली" मधून मराठी चित्रपटसृष्टित पदार्पणास सज्ज आहे. माऊली १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र तसेच परदेशात ही प्रदर्शित होत आहे.

माणसाला अनेक छंद असतात आणि ते जोपासणाऱ्या व्यक्ती त्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यापैकी कुणी आपल्या आवडत्या कलाकाराला किंवा खेळाडूला पहाण्यासाठी दूरवरचा प्रवास देखील करतात. परंतु छंद नसला तरी चित्रपटाचा ट्रेलर बघून तो पाहण्यासाठी चक्क दीड हजार किलोमीटरचा प्रवास करणे ही दुर्मिळ घटना ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या निमित्ताने घडली आहे.

Advertisement