'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात! भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेली सर्व मित्र मग केवळ आठवणीच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच सीमित राहतात. अश्या या सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा 'पार्टी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित या 'पार्टी'चा नुकताच रंगतदार ट्रेलर लाँँच करण्यात आला. धम्माल पार्टी मूडने उपस्थितांना खुश करून टाकणाऱ्या या कार्यक्रमात, 'पार्टी' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थिती लावली होती.

हलाल, ३१ ऑक्टोबर, संघर्षयात्रा या चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर प्रीतम कागणे "अहिल्या" या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती एका डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. खास या भूमिकेसाठी प्रीतमनं बुलेट चालवण्यापासून दोन महिन्यांचं खडतर पोलिस प्रशिक्षणही घेतलं आहे.

अभिनय कट्टयावर आजपर्यंत शेकडो कलाकारांनी हजारो भूमिका रंगवल्या व त्यातील सर्वात जास्त व्यक्तिरेखा साकारणारा अभ्यासू, प्रामाणिक, अतिशय नम्र, प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या संकेत देशपांडेला आदरांजली वाहणारा कट्टा म्हणजे या रविवारचा कट्टा. हातात माईक घेऊन सदैव प्रत्येक रसिक प्रेक्षकांचं स्वागत करणारा संकेत कधीही हातात माईक न घेण्यासाठी निघून गेला. अभिनय कट्ट्यासाठी काळा दिवस होता १० ऑगस्ट २०१८. गेल्या दीड महिन्याआधी संकेतला हृदयविकाराचा झटका आला होता, परंतु त्याची अँजिओप्लास्टी होऊन तो आता पुन्हा एकदा पूर्ववत काम करण्याच्या तयारीत होता. त्याला डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्ट्रेस टेस्ट करण्यासाठी संकेत १० ऑगस्ट रोजी सकाळी बाबांना घेऊन अतिशय उत्साहात बॉम्बे हॉस्पिटलला निघाला. तिथे टेस्ट करून बाहेर पडल्यानंतर काही क्षणातच संकेतची ज्योत मालवली. ही बातमी ऐकताच अभिनय कट्टा व संकेतच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. बातमी पसरताच कट्ट्याच्या शेकडो कलाकारांनी कट्टयाकडे धाव घेतली व कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांच्यासोबत सर्वच कलाकार संकेतच्या घरी पोहोचले, पण ते सत्य कुणालाही स्वीकारता येत नव्हतं. प्रत्येक कलाकाराच्या अश्रूंचा बांध फुटला. संकेतला शेवटचा निरोप देणं उपस्थित प्रत्येकाला असह्य वेदना देणारं होतं. संकेतच्या घरातल्यांप्रमाणेच किरण नाकतींची अवस्था झाली. खऱ्या अर्थाने अभिनय कट्ट्याचा तारा निखळला.

मराठी मनोरंजनाच्या दुनियेत आपल्या प्रेक्षकांसाठी सातत्याने नवनवीन कार्यक्रम देणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या, आपल्या लाडक्या 'झी मराठी' वाहिनीने स्वात्रंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आणली आहे एक विशेष भेट, "किसान अभिमान अॅप". ह्या अॅपद्वारे शेतकऱ्यांना मिळेल त्यांच्या हक्काच बाजाराचं व्यासपीठ आणि शेतकऱ्यांचा शेतीमाल एका क्लीकवर उपलब्ध होईल विकत घेणाऱ्या उपभोक्त्यांसाठीही, संपूर्ण कृषिक्षेत्र आणि त्या संबंधित समुदायाला एकाच डिजिटल व्यासपीठावर एकत्र आणणं हा या किसान अभिमान अॅपचा मूळ उद्देश.

सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात मराठी सिनेसृष्टीत अनेक सिनेमांतून रोमँटिक भूमिका केलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आपल्या आगामी ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमात लव्हगुरूच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटातल्या अशोक सराफ ह्यांच्या भूमिकेचे नुकतेच पोस्टर लाँच झाले आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर २० हून अधिक पुरस्कार पटकावलेला "लेथ जोशी" या चित्रपटानं आता रशिया आणि तैवानमध्ये धडक मारली आहे. या चित्रपटाची तैवानमधील ५८व्या आशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सवासाठी आणि रशियातील साखलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे.

Advertisement