Box Office Collections
Typography

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांत प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालाय. बऱ्याच दिवसांनंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षकांनी व्यक्त केला.

८० चे दशक गाजविलेले ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक, चित्रपट रुपात पहाण्याची उत्सुकता अनेकांना होती. हे माध्यमांतर उत्तम झाल्याचे मान्यवरांचे मत आहे. शुक्रवारी या चित्रपटाने २१ लाख, शनिवारी ३४ लाख तर रविवारी ५२ लाखांची कमाई केली. एकूण या तीन दिवसांत चित्रपटाने एक कोटी उत्पन्नाचा टप्पा ओलांडलाय.

अभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी केलंय. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement