Music Jukebox
Typography

मनोरंजक मूल्यांचा समावेश करत ‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘पाटील पाटील’ हे धडाकेबाज गाणं आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलं असून ‘तुला पाहून’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे. ‘सूर्य थांबला’ या मनस्पर्शी गीताला सुखविंदर सिंग व रेहा विवेक यांचा स्वर लाभला आहे. ‘राधेला पाहून’ व ‘धिन ताक धिन’ या ठेका धरायला लावणाऱ्या गीतांना गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी स्वरबद्ध केलं आहे.

चित्रपटाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. ‘पाटील’ चित्रपटाची ध्वनीफित ‘झी म्युझिक’ने प्रकाशित केली आहे.

Listen All the Songs Here

या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. संतोष राममीना मिजगर, शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ. जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे.

२६ ऑक्टोबर ला ‘पाटील’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement