आवाजातील जरब, मोडेल पण वाकणार नाही हा बाणा आणि मराठी माणसांवर असलेलं प्रेम ह्या गोष्टीमुळे बाळासाहेब ठाकरे या नावाबद्दल मला खूपच कुतूहल होते, पण कधी प्रत्यक्ष भेट झाली न्हवती. 2007 मध्ये माझ्या 'मराठी तारका' कार्यक्रमाचा पहिला शो पुण्यात झाला आणि दुसरा मुंबईत. मुंबईत शो झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही वर्तमानपत्रांमधून त्याच्या बातम्या आणि फोटो छापून आले. 'सामना' पेपरमध्ये पहिल्याच पानावर मोठा फोटो आणि ठळक बातमी आली. ते पाहून मलाही आनंद झाला. तीन चार दिवसांनी मला 'मातोश्री' वरून फोन आला "साहेबांनी भेटायला बोलावलंय". मी जरा गोंधळून विचारलं" कोणत्या साहेबांनी बोलावलंय"? उत्तर मिळालं "बाळासाहेबांनी बोलवलंय".

बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत एकदा नोकरी लागली की, ती व्यक्ती एका वेगळ्या विश्वाचा भाग बनते आणि आपल्या मातीशी असलेली नातं विसरतात असे दिसते. मात्र आगामी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री मालविका गायकवाड याला अपवाद ठरली आहे. मोठ्या पगाराची नोकरी करत असताना तिने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, पुढे स्वतः सेंद्रीय शेतीचा प्रयोग करायला लागली आणि आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या, प्रविण तरडे दिग्दर्शित आगामी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर येत आहे.

सैयामी खेर ने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मिरझिया पासून बॉलीवुड मध्ये तारकीय पदार्पण केले, त्यानंतर सैयामी आता सज्ज झालिये रितेश देशमुख अभिनीत मराठी चित्रपट माउली मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करायला.

सिनेमात 'शान'से चालत येत त्याने घेतलेली एन्ट्री असो की स्टाईलमध्ये हातातला गॉगल फिरवून मग तो डोळ्यावर चढवण्याचा रूबाब असो, सिनेमात त्याने केलेली तुफान फायटिंग पाहून वास्तवात असं काही होत नाही हे आपल्याला माहीत असूनही आपल्याला त्याच्या प्रेमात पाडणारा साऊथचा सुपरस्टार म्हणजे रजनीकांत. हिंदीत डब होऊन आलेले त्याचे काही चित्रपट टीव्ही वर मी पाहिले होते. पण या खऱ्या सुपरस्टार चा महिमा जेंव्हा मी स्वतः अनुभवला तेंव्हा खात्री पटली की साऊथचे प्रेक्षक का त्याला एवढं डोक्यावर घेतात.

चित्रपटांमधून कधी खतरनाक खलनायक, कधी प्रेमळ बाप, कधी गर्विष्ठ श्रीमंत अशा विविध भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते प्राण साहेब.शहरी आणि ग्रामीण ढंगाच्या भूमिकांमधून खऱ्या अर्थाने चित्रपटांचाही 'प्राण' होते. याचं सारं श्रेय त्यांच्या अभिनयाला. प्राण साहेबांना भेटण्याची माझी खूप इच्छा होती, पण अभिनय करणे बंद केल्यापासून त्यांनी ठरवून स्वतःला चित्रपटसृष्टी पासून दूर ठेवले होते. कुणालाही ते भेटत नसत.

नाव आणि आडनावात कुठे ही काना,  मात्रा,वेलांटी नसलेला, नावाप्रमाणेच सरळ आयुष्य जगणारा मराठी कलावंत शरद तळवलकर. सगळेजण त्यांना 'काका' म्हणत, पण चित्रपटसृष्टीत राहूनही त्यांनी आयुष्यात कधीच कुणाला 'मामा' बनवलं नाही. प्रसंगी स्पष्टपणे बोलणारे, हजरजबाबी, मस्करी करत जगण्याचा आनंद घेणारे शरद काका मनाने ही तितकेच हळवे होते. एकदा त्यांच्याशी मैत्री झाली की मग त्या शरदाच्या चांदण्यात फिरताना पुरेपूर आनंद मिळणार.

Advertisement