Exclusive
Typography

तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी मराठी निर्माते आणि दिग्दर्शक नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. दुसरीकडे मराठीत येणाऱ्या गाण्यांमध्ये ग्लॅमर आणि तरुणाई हळूहळू प्रवेश करते आहे. अशा वेळी चित्रपटातील गीतांबरोबरच युट्युबवरील म्युझिक सिंगलची संख्याही झपाट्याने वाढत आहे. या नव्या युगातील तरुणाईला पसंत पडतील अशीच काहीशी गाणी लिहीली जाणेही काळाची गरज बनली आहे. त्यामुळेच नव्या दमाचा गीतकार मिळण्यासाठी संगीतकार झटताना दिसत आहेत.

गणेश साबळे हा असाच एक नव्या दमाचा आणि नव्या युगाचा गीतकार आहे ज्याची गाणी फारच कमी कालावधीत तरुणवर्गात पसंत केली जात आहेत. मुळचा लोणावळ्याचा असलेल्या गणेश ची आत्तापर्यंत ३ गाणी प्रदर्शित झाली आहेत. ह्या गाण्यांना प्रसिद्ध गायक प्रियांका बर्वे आणि रोहीत राऊत यांसारख्या तरुण गायकांचा आवाज लाभला आहे. ही तीनही गाणी लिम्का बुकमध्ये नाव कोरलेले संगीतकार 'तेजस चव्हाण' यांनी संगीतबद्ध केली आहेत. तरुणवर्गाला आपलेसे वाटतील असेच काहीसे या गाण्यांचे शब्द आहेत. नव्या युगाला साजेशी गाणी करत असतानाच गाणं अर्थपूर्ण करण्यावरही त्याचा भर आहे. शिवाय गीत फक्त लोकप्रिय न होता मनामनाध्ये चिरंतर काळासाठी घर करून रहावे अशा विचारानेच गणेश लिहितो. यामुळेच गणेशला अजून ४ गाणी करण्याची संधी मिळाली आहे, जी गाणी लवकरच प्रदर्शित होणार आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे गणेश ला लवकरच मराठी चित्रपटातील गाणी लिहीण्याची संधी मिळेल यात शंका नाही.


Social Media Accounts

Facebook
Professional Page: https://www.facebook.com/GaneshSable410/
Personal Account: https://www.facebook.com/Ganesh.sable.731/

Instagram
https://www.instagram.com/pranitjaan/


हि ३ गाणी नक्की ऐका

बिनधास्त परी

हॅपी बर्थडे - दि बर्थडे साँग

मैत्री - बेधुंद हवा

Upcoming song list
सांग ना गं आई
मेरे घर मे तेरे
ए तिरंगे
प्रेक्षक जल्लोष (सार्थक पब्लिसीटीचे शिर्षक गीत)

Working Photos

Lyricist Ganesh Sable with Singer Priyanka Barve

Lyricist Ganesh Sable with Singer Rohit Raut

 

 

3.8333333333333 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 3.83 (3 Votes)
Related Article You May Like
Advertisement