Exclusive
Typography

एक मुलगी हि घराची शोभा असते, स्त्री गुह्लक्ष्मी असते, बहिण भावाच्या मनगटावर असेलेली शान असते. समाजात, घरात स्त्रीचे स्थान खूप महत्वाचे आहे. एक स्त्री जितक्या कुशलतेने घर सांभाळते अगदी तितक्याच कुशलतेने ती काम, व्यवहार या देखील बाबी निपुण पणे पार पाडत असल्याचे दिसून येते. अनेक बाकीच्या क्षेत्रात देखील स्त्रीयांचा ठसा उमटलेला दिसून येतो. मग अश्या या स्त्रियांना जागतिक महिला दिवस निमित्ताने कलर्स मराठीवरील लाडक्या कलाकारांनी काही मोलाचे सल्ले दिले.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥

Titeeksha Tawde

Titeeksha Tawde Saraswati

तितिक्षा तावडे (सरस्वती ) – स्त्री म्हणून जन्मल्याचा अभिमान बाळगा !

“मला स्त्री म्हणून जन्मल्याचा अभिमान आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याबद्दल मी नाखूष आहे वा मला तक्रार करावीशी वाटते. आजच्या दिवशी माझा स्त्रियांना एकच संदेश असेल कोणासाठी वा कशासाठी कधीही स्वत:ला बदलु नका, ज्याक्षणी तुम्ही स्वत:वर प्रेम कराल आणि आनंदी रहाल त्या क्षणापासून तुम्हाला दुसऱ्यांसाठी काही करण्याची वा स्वत:ला बदलण्याची गरज भासणार नाही”.

Rujuta Deshmukh

Rujuta Deshmukh Aawali Tu Maza Sangati

ऋजुता देशमुख – (आवली - तू माझा सांगाती) – महिलांकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक!

महिलांकडे बघण्याचा महिलांचाच दृष्टीकोन काही ठिकाणी बदलायला हवा. आपणच एकमेकींना साथ दिली तर कदाचित वर तोंड करून आपल्याला विरोध करणाऱ्यांची वृत्ती कमी होण्याची शक्यता आहे. महिला म्हणून आपण वैविध्यपूर्ण भूमिका प्रेमानी पार पाडतो, एखाद्या परिस्थितीकडे भावूक पद्धतीने बघतो आणि ताकदीनिशी आपलं नावं व्यवसायात देखील कमावतो. या सगळ्यामुळे महिला असल्याचा मला अभिमान वाटतो.

Bhagyashree Limaye

Bhagyashree Limaye Amruta Ghadge and Suun

भाग्यश्री लिमये (अमृता घाडगे - घाडगे & सून ) – इतरांची ढाल बनायचं !

मी मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. याचं कारण मला घरातून कधीही मुलगी आहे म्हणून दुय्यम वागणूक मिळाली नाही, उलट माझे सर्व लाड माझ्या आई बाबांनी पुरवले. आपली मुलगी जगात सक्षमतेनं वावरू शकली पाहिजे यासाठी योग्य ते शिक्षण दिले. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले उच्च शिक्षण घेऊनही मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच ठरवलं तेंव्हाही बाबांनी मला सर्वार्थानी पाठींबा दिला म्हणून मी अभिनेत्री होण्याचं स्वप्न आज साकार करू शकले. मुलगी असो वा मुलगा दोघांनीही समाजात एक उत्तम नागरिक म्हणून नाव मिळवलं पाहिजे असे संस्कार माझ्या आईवडिलांनी आम्हा बहीण – बावाव्र केले. आज महिला दिनाच्या निमित्ताने मला सर्वांना असं सुचवावसं वाटतं की, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्याचबरोबर आम्ही मुली स्वतंत्र व्यक्तीमत्व आहोत. आम्हीही घराण्याचं नाव उज्ज्वल करू शकतो. आईवडिलांचा आधार होऊ शकतो. देशाची शान बनू शकतो. म्हणूनच मुलींनो... “स्त्री असल्याचा अभिमान बाळगा” जिजाऊ सावित्रीबाई, रमाबाई यांचा वारसा आपल्याला लाभला आहे. त्यामुळे आता फक्त आणि फक्त पुढे जायचं आणि इतरांसाठी ढाल बनायचं.

Chinmay Udgirkar

Chinmay Udgirkar Akshay Ghadge Ghadge and Suun

चिन्मय उदगीरकर (अक्षय घाडगे - घाडगे & सून) – स्त्री ही सगळ्याच बाजूंनी पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे !

स्त्री हि सगळ्याच बाजूंनी पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. सहनशीलता, परिस्थितीशी जुळवून घेणे, माणसा माणसातील नाते संबंध टिकण्याच्या दृष्टीने जो समंजस स्वभाव लागतो या सगळ्या अनुषंगाने. आज जी अराजकता वाढली आहे त्यावर मात करण्यासाठी त्यावरचा उपाय शोधण्यासाठी संयम, सहनशीलता, समजूतदारपणा, सर्वसमावेशकता हे गुण महत्वाचे आहेत आणि याच मूर्तीमंत प्रतिक म्हणजे “स्त्री”. स्त्री सर्वार्थाने समाजाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तसेच नवनिर्मितीचा अधिकार देखील देवाने स्त्रीला दिला आहे. त्यामुळे स्त्रीयांनी खंबीरपणे प्रत्येक बिकट क्षणाला सामोरी जावं तिला कोणाच्याही सहानभूतिची आधाराची गरज नाही... असं मला वाटत ...

Sachit Patil

Sachit Patil Prem Deshmukh Radha Prem Rangi Rangli

सचित पाटील (प्रेम देशमुख - राधा प्रेम रंगी रंगली) – पुरूषांनी महिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे गरजेचे

महिला दिन एकाच दिवशी साजरा न होता तो खरतर रोज साजरा व्हायला हवा. इतकं महिलांच महत्व आहे. आज मी जे काही आहे ते माझ्या आई, माझी बहीण आणि माझी बायको शिल्पामुळेच आहे. लहानपणापासून माझ्या आईचं जे योगदान आहे, माझ्यासाठी केलेली मेहेनत त्यामुळे मी इथे आहे. आणि आता माझी बायको माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे जिथे जिथे मला गरज भासते ती न सांगता तिथे असते. जेंव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो तेंव्हा त्याच्यामागे महिलांच योगदान असतं. मला महिलांना नाहीतर पुरूषांना संदेश द्यावासा वाटतो... कि, पुरुषांनी महिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

Veena Jagtap

Veena Jagtap Radha Deshmukh Radha Prem Rangi Rangli

वीणा जगताप (राधा देशमुख - राधा प्रेम रंगी रंगली) – धीट बना

Women is Attitude and Woman is Gratitude … या वर्षी महिलादिनानिमित्त मी सगळ्या स्त्रियांना सांगू इच्छिते कि धीट बना ! देवाने स्त्रीला सगळ्यात मोठा हक्क दिला आहे ती म्हणजे एका दुसऱ्या जीवाला या जगात आणण्याचा... म्हणजे स्त्रीमध्ये किती सामर्थ्य, किती शक्ती असेल याची जाणीव ठेवा आणि तसं आलेल्या समस्यांन सामोरं जा... आपल्याला स्त्री जन्म लाभला आहे हे आपले भाग्य आहे...

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement