Exclusive
Typography

"गुढीपाडवा म्हणजे आपले नवीन वर्ष. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत व्हावे यासाठी सर्वचजण तयारी करत असतात. गुढी खरं तर आनंदाचे प्रतिक असते. नवीन वर्षाची एक नवी सुरुवात आपण या दिवशी करत असतो . आनंदाची, प्रेमाची, नव्या सकारात्मत विचारांची आणि नव्या संकल्पांची गुढी आपण जर उभारली तर ख-या अर्थाने आपण गुढीपाडवा साजरा करतो, असं म्हणायला हरकत नाही." - ऋता दुर्गुळे

"माझ्या घरी अगदी पारंपारिक पध्दतीने गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवाच्या दिवशी सर्वजण घरी असतात त्यामुळे सर्वांच्या उपस्थितीत गुढी उभारली जाते. आई छानपैकी नैवेद्याचं जेवण तयार करते, ज्याची चव चाखण्यास आम्ही सर्वजण आतूर असतो. यावर्षी मालिकेच्या शूटिंगपासून रजा घेतली असल्यामुळे मी भावंडं, आई-बाबा असे आम्ही एकत्र या सणाचा आनंद लुटणार आहे. तसेच नवीन वर्षाचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यासाठी शोभायात्रा काढल्या जातात आणि यंदाच्या वर्षी मी गिरगांव, वरळी आणि लोअर परळ येथील शोभायात्रेत सामील होणार आहे."

"या नवीन वर्षाचा माझा संकल्प हाच असेल की, मी प्रेक्षकांना भूमिकेच्या माध्यमांतून सतत नवनवीन देण्याचा प्रयत्न करेन. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी मला त्यांचे प्रेम दिले आहे आणि पाठिंबा दर्शविला आहे, जो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला आहे त्याप्रती मला नेहमीच आदर राहिल. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील जे एक सुंदर नातं असतं ते जपण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.”- ऋता दुर्गुळे

Hruta Durgule Gudipadwa Plan 02

Hruta Durgule Gudipadwa Plan 03

Hruta Durgule Gudipadwa Plan 04

Hruta Durgule Gudipadwa Plan 05

Hruta Durgule Gudipadwa Plan 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement