Exclusive
Typography

मराठी कलाकारांचे गुढीपाडव्या निमीत्त संदेश

हेमंत ढोमे, अभिनेता
मराठीपणाची 'गुढी' उभारु

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कुटूंबासोबतच अगदी मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीनने गुढी उभारणार आहे. नंतर सगळ्यांसोबत मस्त आमरस पुरी वर ताव मारणार, सध्या आपला मराठी माणूस विविध जाती धर्मात विभागला आहे. हिच विषमता बाजुला सारुन, सगळ्यांनी एकत्र येऊन मराठी भाषेची आणि मराठीपणाची गुढी उभारुया. या नवीन वर्षात माझे एक नाटक येत आहे, सध्यातरी या नाटकाचे नाव गुलदस्त्यात असून, या नाटकाचा पहिला प्रयोग दुबईला होणार आहे, आणि 'सातारचा सलमान' हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.

Hemant Dhome

Hemant Dhome

भाऊसाहेब शिंदे, अभिनेता
शेतकऱ्यासाठी नवीन वर्षाची हीच खरी सुरुवात

ग्रामीण भागात 'गुढीपाडवा' या सणाचा उत्साह तसा मोठाच! कारण या सणापासूनच आपला शेतकरी वर्ग नवीन कामाला सुरुवात करतो. मी स्वतः शेतकरी कुटुंबातला असल्याकारणामुळे, शेतकऱ्याच्या घामाचे महत्व मला चांगलेच ठाऊक आहे. आमच्या गावी सुर्योदयापुर्वीच घराच्या मोठ्या प्रांगणात लांबसडक काठी आणून त्यावर गुढी उभारली जाते. त्यादिवशी आम्ही सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन ग्रामपंचायतीचा लेखाजोखा, राहिलेले प्रश्न आणि हिशोबाची आखणीदेखील करतो. मराठी नववर्षाची हीच खरी सुरुवात असल्याकारणामुळे नवीन संकल्पनादेखील यावेळी राबवल्या जातात. माझ्यासाठी यंदाचा गुढीपाडवा खूप खास आहे, कारण एका ग्रामीण युवकाच्या आयुष्यावर आधारित असलेला माझा 'बबन' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या इच्छा, त्यांचे स्वप्न काय असते हे यामार्फत लोकांसमोर येणार आहे. खर तर कामानिमित्त गावाकडची बरीचशी माणसे शहरात गेली आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो कि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या गावी पुन्हा या. आपल्या जवळच्या माणसांसोबत हा सण साजरा करा. पैशांपेक्षा नाती लाखमोलाची असतात. साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्या घरच्यांसोबत 'गुढी' उभारण्याचा आनंद हा काही न्याराच असतो.

Bhausaheb Shinde

Bhausaheb Shinde

गायत्री जाधव, अभिनेत्री
यावर्षीचा गुढीपाडवा खूप खास

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतिने गुढी पाडवा साजरा करणार आहे. पण या वर्षीचा गुढी पाडवा माझ्यासाठी खास आहे कारण या नवीन वर्षासोबत माझी सुद्धा नवीन वाटचाल सुरु झाली आहे. लवकरच आमचा बबन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार असून, या चित्रपटाद्वारे मी चित्रपटसृष्टीत माझे पहिले पाऊल टाकत आहे. खूप साध्या, सहज पण विचार करायला लावणाऱ्या अशा विषयावर 'बबन'चे कथानक आधारलेले आहे. या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मी अशी आशा करते कि, तुम्ही माझ्यावर आणि आमच्या सर्वांवर भरभरून खुप प्रेम कराल. माझ्याकडून आणि संपूर्ण बबन टिमच्यावतीने तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gayatri Jadhav

Gayatri Jadhav

श्रेयस जाधव (किंग जेडी), रॅपर, निर्माता, सिनेदिग्दर्शक
नवनवीन प्रयोगाची 'गुढी' उभारणार

मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे 'गुढी पाडवा'. आपल्या मराठी लोकांसाठी हा दिवस खूप मोठा असून, इंग्रजी केलेंडरनुसार आपण १ जानेवारीला जसे महत्व देतो, तेवढेच महत्व किमान मराठी तरुणांनी तरी 'गुढी पाडवा'ला द्यायला हवे. आमच्या पुण्यात या दिवसात मोठा उत्साह पाहायला मिळतो. अनेक साग्रसंगीत कार्यक्रम घडतात. ढोलताशा पथक, लेजीम पथक रस्त्यांवर उतरतात. विविध वादकांच्या जयघोषात आम्ही पुणेकर नववर्षाचे उत्साहात स्वागत करतो. यावर्षीदेखील असेच असणार आहे. शिवाय यावर्षी आमच्या गणराज असोशिएटस निर्मिती संस्थेअंतर्गत नवनवीन प्रयोगाची 'गुढी' मी उभारणार आहे. ज्यात 'मी पण सचिन' या सिनेमाच्या चित्रीकरणाची जोरात तयारी सुरु आहे, काही रॅप सॉंगदेखील देण्याच्या मी विचारात आहे.

Shreyash Jadhav

Shreyash Jadhav

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement