Exclusive
Typography

नाटक, चित्रपट, मालिका आणि हल्ली तर वेब सिरीजच्या माध्यमांतून देखील कलाकार प्रेक्षकवर्गांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकारांच्या मेहनतीची, अभिनय कौशल्याची दाद प्रेक्षक नेहमीच देत असतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील नातं हे खरंच सुंदर आहे. अनेक कलाकार हे त्यांच्या-त्यांच्या परीने प्रेक्षकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकासाठी मनापासून आभार मानतात. अशाच प्रकारे मराठी मनोरंजनसृष्टीतील गोंडस आणि सुंदर अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने देखील तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर एक उपक्रम राबविला होता. ज्यामध्ये ऋताच्या चाहत्यांना तिची आवड-निवड याविषयी जाणून घ्यायला मिळाले.

आपल्या आवडत्या कलाकाराविषयी अधिकची माहिती अथवा आपल्या कलाकाराची आवड-निवड जाणून घ्यायला मिळाली की चाहत्याला आनंद वाटतो आणि जर ही माहिती स्वत: कलाकार देत असेल तर त्यांच्यासाठी ही खरोखरंच आनंदाची गोष्ट असते. अभिनय क्षेत्रात व्यस्त असूनही ऋताने वेळात वेळ काढून तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम या सोशल मिडीया माध्यमावर #GetToKnowHruta ही कॅम्पेन सुरु केली होती ज्यामध्ये तिने चाहत्यांना तिचे आवडते कलाकार, पदार्थ, चित्रपट, गाणी, छंद ओळखायला सांगितले होते. फॅन्सनी योग्य अंदाज बांधल्यावर ऋताने स्वत: सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.

ऋताचे फेव्हरेट चित्रपट आहेत दिल धडकने दो, पिकू आणि पॅडमॅन. पहला नशा, टिक टिक आणि तुम साथ हो ही आवडती गाणी आहेत. वाचन, डान्स आणि ड्रायव्हिंग हे तिचे छंद आहेत. आवडते अभिनेते रणवीर सिंह, रणबीर कपूर आणि हृतिक रोशन हे आहेत तर दिपीका पदुकोण, आलिया भट आणि काजोल या आवडत्या अभिनेत्री आहेत आणि ऋताला भारतीय पदार्थ जास्त आवडतं.

अशाप्रकारे #GetToKnowHruta कॅम्पेनमुळे फॅन्सना त्यांची लाडकी अभिनेत्री ऋताविषयी नवीन जाणून घ्यायला मिळाले.

3.1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 3.10 (5 Votes)
Related Article You May Like
Advertisement