Exclusive
Typography

७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आपले आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे. या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने आरोग्याशी निगडीत आपले विचार मांडतो आणि जमेल तशी मदत करत असतो. ही मदत कोणत्याही स्वरुपाची असू शकते. जसे की एखादा सल्ला किंवा काळजी देखील मदत असू शकते. अशीच मदत अभिनेत्री ऋता दुर्गुळेने केली आहे.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ऋताने प्रेक्षकांपर्यंत एक संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये तिने प्रेक्षकांकडून स्वत:च स्वत: ची काळजी घेण्याचे वचन मागितले आहे. सध्या उन्हाळा खूप आहे आणि या वाढत्या गरमीमुळे अनेकांना त्रास होत आहे. तर या गरमीच्या वातावरणात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला ऋताने दिला आहे. उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशन होते ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवून या उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या असा मौल्यवान सल्ला ऋताने दिला आहे.

Watch the Video Message

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement