Exclusive
Typography

२० एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘शिकारी’ या मराठी चित्रपट रसिकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या अनेक वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एक म्हणजे चित्रपटात तीन आघाडीचे विनोदवीर आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ आणि इतर मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेले भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे आणि वैभव मांगले या चित्रपटांत महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आघाडीचे दिग्दर्शक विजू माने करत आहेत. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे, तर तेवढीच महत्वाची भूमिका सुव्रत जोशीने यात साकारली आहे. त्यांच्याबरोबर भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे आणि वैभव मांगले, कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.

भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे आणि वैभव मांगले यांच्या महत्वाच्या विनोदी भूमिका

भालचंद्र कदम, भरत गणेशपुरे आणि वैभव मांगले या विनोद्विरांमुळे या चित्रपटाला एक वेगळ्या दर्जाचे मनोरंजनमूल्य प्राप्त होणार आहे. त्याचमुळे, वेगळ्या धाटणीचा, बोल्ड अशी या चित्रपटाची जी ओळख प्रस्थापित झाली आहे त्याचबरोबर या चित्रपटाने मनोरंजनाच्या पातळीवरही वेगळ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत.

महेश मांजरेकर यांनी ‘शिकारी’चे सादरीकरण केले आहे आणि आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement