Exclusive
Typography

गुरु गोबिंदसिंगाच्या पवित्र पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली नांदेडची भूमी या भूमीमधून आजपर्यंत अनेक चेहरे नावा रुपाला आले. त्यातील एक म्हणजेच नांदेडची भूमीकन्या नवोदित सिनेअभिनेत्री शितल चव्हाण हि ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा दुसरा सिनेमा बबन या मध्ये पप्पीच्या भूमिकेत झळकली आहे.


शितल चव्हाण हिचा जन्म २३ जून १९९६ रोजी झाला. हदगाव तालुक्यातील गोरलेगाव या छोट्याशा गावातील मुलीने बबन या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. शितल चव्हाण हि वडील काशिनाथराव व आई सौ सिमा यांच्या संस्कारातून लहानाची मोठी झाली. शीतलने प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा हदगाव येथील विवेकानंद शाळेमध्ये केला. तसेच पुढील शिक्षणासाठी ती नांदेड ला आली व सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा येथे माध्यमिक तर उच्चमाध्यमिक शिक्षण यशवंत महाविद्यालय येथून पूर्ण केले. तदनंतर पदवीच्या उच्च शिक्षणासाठी तिने पुणे येथील मॅक इन्स्टिटयूट येथे प्रवेश घेतला व तेथूनच खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली. तिचे वडील भारतीय सेनेमध्ये कार्यरत असल्यामुळे तिने वडिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व देशासाठीचे योगदान पाहून त्यांच्या साठी काही तरी करायचे ठरवले.

शैक्षणिक जीवनामध्ये शिक्षण घेत असताना शितल कोणत्याही गोष्टींमध्ये मध्ये सगळ्यात पुढे असायची त्यातच तिने नांदेड येथे असताना नांदेडच्या मिस्टर अँड मिस २०१३ मध्ये सहभाग नोंदवला आणि विशेष म्हणजे ती त्यावर्षीची मिस नांदेड झाली. हा क्षण तिच्यासाठी आनंदी व आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. पुढे तिला मॉडेलिंग साठी फोटो काढण्याची आवड निर्माण झाली याच गोष्टीचा तिला चित्रपटसृष्टी मध्ये खूप उपयोग झाला.

Shital Chavan Exclusive Article 03

चित्रपट सृष्टीच्या पदार्पणासाठी कलेचा कुठलाही वारसा व कोणाचेही मार्गदर्शन नसताना ग्रामीण भागातून नांदेड येथे येऊन व थेट पुणे येथील मॅक महाविद्यालयात शिक्षण शिकत असताना दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे हे एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना शितलने त्यांची ओळख करून घेतली व नंतर अचानक दोन वर्षाने तिला बबन या चित्रपटाच्या मिटिंग साठी निमंत्रित करण्यात आले होते. त्या नंतर तिची निवड करण्यात आली व बबन या सिनेमातील पप्पीची भूमिका देण्यात आली व तिने देखील तेवढ्याच जबाबदारीने अतिउत्तमपणे भूमिका रेखाटली आहे.

On Set of Baban

Shital Chavan Baban 02

मुख्य म्हणजे हा सिनेमा तिच्या आयुष्यासाठी पहिला व खूप काही अनुभव शिकवणारा होता व या सिनेमामध्ये काम करताना तिचे आई-वडील, भाऊ, बहीण व संपूर्ण परिवार तिच्या पाठीशी खंबीर पणे उभा होता. विशेष म्हणजे भाऊराव कऱ्हाडे यांनी देखील नवोदित अभिनेत्री असून सुद्धा तिच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन तिला खूप उत्तम पणे अभिनय समजावून सांगितला व तेवढ्याच कष्टाने तिच्याकडून चित्रपटातील भूमिका रेखाटून घेऊन बबन या सिनेमामध्ये अभिनय करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

साऱ्याच कळ्याना हक्क आहे फुलण्याचा
मातीमधला वतनवारसा आकाशावर कोरण्याचा
कळी असो गुलाबाची अथवा कमळाची
तिच्यासाठी तिष्ठत असतो प्रत्येक किरण सूर्याचा.....

ग्रामीण भागातून थेट मराठी चित्रपटसृष्टी असा प्रवास करणाऱ्या माझ्या शालेय जीवनामधील मैत्रीण शितल चव्हाण हिला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. उत्तरोत्तर तुला भरपूर सिनेमामध्ये अभिनय करण्याची संधी मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!

लेखक - शुभम गुरुनाथराव बोंबले

Article Writer friend Shubham Bomble with Shital Chavan

Shital Chavan Exclusive Article 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News