Exclusive
Typography

मातृ देवो भव!!!

सुयश टिळक, अभिनेता (बापमाणूस - झी युवा)

माझी आई माझ्या जवळची मैत्रीण आहे. मला काही कमी पडू नये त्यासाठी ती दिवसाचे २४ तास कष्ट करते. मी लहान होतो तेव्हा पासून ती स्वतः सिलेब्रिटी असून घर आणि काम याचा उत्तम बॅलन्स कसा साधायचा हे तिच्याकडून शिकत आलो आहे. तिचं भरतनाट्यमची एक मोठी गुरु असणं आमच्या आई मुलाच्या नात्यामध्ये कधीच डोकावलं नाही. आज मी जे काही आहे ते माझ्या आई आणि बाबांमुळे आहे.

Mothers Day Quotes Suyash Tilak

अश्विनी कासार, अभिनेत्री (कट्टी बट्टी - झी युवा)

माझ्या आईला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि तिकडच्या फेमस डिशेस, लोकल फूड खायला खूप आवडतं. मला वाटतं की मला पण ही आवड तिच्यामुळे निर्माण झाली. तिच्यामुळेच मला गाणी ऐकण्याची, कविता करण्याची, आपले विचार लेखणीतून मांडण्याची गोडी लागली. आई ही एकच अशी व्यक्ती असते जी तुम्हाला कुठल्याही अपेक्षेशिवाय किंवा अटीशिवाय प्रेम करते. आपण तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून कृतज्ञता व्यक्त केली, तिची काळजी घेतली तरीही ती खुश होते. सगळ्या आईंना मी मातृदिनाच्या शुभेच्छा देते.

Mothers Day Quotes Ashwini Kasar

फुलवा खामकर, कोरिओग्राफर (परीक्षक: डान्स महाराष्ट्र डान्स - झी युवा)

माझ्या आईकडून मला डान्सची आवड निर्माण झाली. मी माझ्या आईकडून खूप काही शिकले. मी स्वतः एक आई आहे त्यामुळे आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं ही किती मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. मी सर्व आईंना हाच एक संदेश देऊ इच्छिते की तुमच्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्याआधी एक सुजाण आणि चांगलं माणूस बनवा.

Mothers Day Quotes Phulwa Khamkar

संकर्षण कऱ्हाडे, अभिनेता (देवाशप्पथ - झी युवा)

माझी आई म्हणजे; सकारात्मकता, संयम, सात्विकपणा आणि अप्रतिम स्वयंपाक ह्या सग्गळ्याचा साठा आहे. व्हाॅट्स ॲप च्या जोक शेअर करण्यापासुन ते योग्य भाषेत कान टोचण्यापर्यंत.. आणि कामातल्या कौतुकापासुन ते संसारातल्या हितगुजापर्यंत सग्गळ्या गोष्टींवर ती माझ्याशी बोलु शकते.. माझ्या बाबांची ३७ वर्षांची बॅंकेतली यशस्वी नोकरी, ३ भावंडांचं योग्य संगोपन आणि करीयर हे तिच्याच निस्वार्थी कष्टाचं फलीत आहे. जगण्याची हि दृष्टी तिने नक्कीच तिच्या आई कडनं घेतली.. आणि ताई पर्यंत अजुन प्रभावीपणे पोचवलीये.. तिला नमस्कारच नाही.. साष्टांग दंडवत आहे..

Mothers Day Quotes Sankarshan Karhade

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News