Exclusive
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणारे टास्क, घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद - विवाद, भांडण, मैत्री हे सगळचं चर्चेचा विषय आहेत यात शंका नाही. बिग बॉस मराठीचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत आहे. सदस्य एखाद्या मालिकेचे वा सिनेमामधील पात्र म्हणून लोकांसमोर येत नसून ते जसे आहेत तसे ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत कोणताही मुखवटा न बाळगता. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. नुकतीच हर्षदा खानविलकर यांची कार्यक्रमामध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली होती. हर्षदा यांचा घरातील एक आठवडा चांगलाच रंगला. आता या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एन्ट्री होणार आहे. हर्षदानंतर आता वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे शर्मिष्ठा राऊत घरामध्ये जाणार आहे. आता घरातील रहिवाशी संघाची काय प्रतिक्रिया असेल ? घरामध्ये कोणते रंजक वळण येईल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

शर्मिष्ठा राऊत यावर बोलताना म्हणाली, “मी खूप उत्सुक आहे, आत नक्कीच खुप मज्जा येणार आहे, पण तितकच टेंशन सुध्दा आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेले सगळेच सदस्य माझे मित्र आहेत. पण मी माझा स्वतंत्र खेळ खेळणार हे नक्की. मी बिग बॉसची चाहती आहे. मीच माझी खूप मोठी स्पर्धक आहे असे मला वाटतं. या घरामध्ये मी माझा लढा लढेन आणि मीच स्वत:ला हा खेळ जिंकून देऊन शकते. टास्कबद्दल बोलायचं झालं तर, मला टास्क खूप आवडतात कारण माझ्या आयुष्यात देखील मला Adventure खूप आवडतं. मी आताचं स्काय डायव्हिंग केलं आहे. त्यामुळे टास्ककडे खूपच सकारात्मक दृष्टीने बघते. मी जशी माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये आहे तशीच मी या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये देखील वावरताना प्रेक्षकांना दिसेन, कारण कार्यक्रमाची Taglineच आहे दिसतं तसंच असतं. जिथे मला पटेल तिथे मी शांत असेन पण जिथे मला पटणार नाही तिथे मात्र मी नक्कीच बोलणार.”

Bigg Boss Marathi Sharmishtha Raut Wild Card Entry 02

बिग बॉस मराठी या कार्यक्रमामधील स्पर्धक तर चर्चेत आहेतच जसे अनिल थत्ते यांची थत्तेगिरी, मेघाची टास्क आणि बिग बॉस मराठी जिंकण्यासाठीची जिद्द, मेघा आणि रेशम मधील भांडण, भूषण आणि पुष्करचे संयम राखून खेळ खेळणं, सई आणि पुष्करची मैत्री आणि घरामध्ये बनलेले दोन गट. तसेच महेश मांजरेकर यांचा WEEKEND चा डाव. आता वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन शर्मिष्ठा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यावर सदस्य नक्की काय बोलतील ? कसे तिचे स्वागत होईल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

शर्मिष्ठाने घरातील सदस्य तसेच तिला कोण आवडते, कोणाशी मैत्री होईल ? महेश मांजरेकर तसेच WEEKEND चा डाव याबद्दल देखील थोडं सांगितलं ती म्हणाली, “सध्या असलेल्या सदस्यांपैकी माझी मेघाशी चांगली आणि लगेच मैत्री होईल असे मला वाटते. मेघा आणि पुष्कर हे मला strong स्पर्धक वाटतात. स्पर्धा तर असणारच पण, मी येतानाच अंतिम सोहळ्याची तयारी करून आले आहे त्यामुळे नक्कीच तिथंपर्यंत जायला आवडेल. WEEKEND चा डाव भागाबद्दल सांगायचं म्हणजे महेश सरांशी बोलायला पण भीती वाटते बाहेर इथे ,तर शाळा असणार आहे त्यामुळे जे ते सांगतील ते माझ्या चांगल्यासाठीच असेल, कारण ते जे सांगतील त्याद्वारे मला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मिळेल. त्यामुळे जे काही बोलतील ते मी चांगल्याच प्रकारे घेणार आहे.”

आता पुढील आठवड्यांमध्ये प्रेक्षकांना घरामध्ये काय काय बघायला मिळणार आहे ? कोणत्या प्रकारचे टास्क असणार आहेत ? हे सगळच बघणं रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi Sharmishtha Raut Wild Card Entry 03

1.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 1.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement