Exclusive
Typography

गेल्या एका दशकाहून जास्त काळ जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यरत असणारे रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी आता दिग्दर्शनासह अभिनयाकडे आपली पावले वळविली आहेत. चित्रपट, माहितीपट, लघुपट, रियालिटी शोमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवून यश मिळवले. हा संघर्ष सुरू असतानाच "लेट्‌स गो बॅक' या मराठी चित्रपटात त्यांना महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर जवळपास दोन वर्ष चांगल्या भूमिकेच्या शोधात असतानाच अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. पण, मनासारखी भूमिका मिळाली नाही. त्यावेळी त्यांनी मिळेल ते काम केले. मात्र, त्यांना एक गोष्ट जाणवली की अभिनय करायचा असेल तर तुम्हाला घरातून भक्कम पाठिंबा हवा आहे. नाहीतर चित्रपटसृष्टीत तुमचा कोणीतरी गॉडफादर पाहिजे. यापैकी त्यांच्याकडे कोणतीही गोष्ट नव्हती.

अभिनयाबरोबरच पत्रकारिता करत रामकुमार हे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत झाले. या काळात अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक संस्थांचा ते जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे आणि आतापर्यंत 100 हून अधिक चित्रपटांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणूनही काम पाहिले. हे करत असताना रामकुमार यांनी दीडशेंहून जास्त माहितीपट, लघुपटांचे दिग्दर्शन केले. हे करत असतानाच लेखक आबा गायकवाड यांच्याकडून एक संवेदनशील अशी गोष्ट त्यांनी ऐकली, अन चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे त्यांनी ठरविले. त्यानंतर निर्माते मिहीर कुलकर्णी यांच्याशी बोलणे झाले. "अ.ब.क' चा विषय निघाला. अन खऱ्याअर्थाने येथूनच त्यांच्या दिग्दर्शनाचा प्रवास सुरू झाला.

Ramkumar Shedge Director Debut Aa Bb Kk 02

‘अ.ब.क' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करणारा आहे. यात हिंदी, मराठी, तेलगू, भोजपुरी आणि मराठीतील तगडी स्टार मंडळी काम करत आहे. तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी, रवी किशन, साजिद खान, सतीश पुळेकर, विजय पाटकर, किशोर कदम, बालकलाकार ऑस्करमध्ये गाजलेली "लायन' फेम सनी पवार, साहिल जोशी, मिथाली पटवर्धन, आर्या घारे अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील एका गीताला अमृता देवेंद्र फडणवीस यांचा स्वर लाभला आहे.

ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित अ.ब.क.चे लेखन आबा गायकवाड, संगीत – बापी टूटूल – साजिद वाजीद, छायाचित्रण - महेश अने, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे आहे. तर चित्रपटातील एका स्पुर्ती गीताला अमृता देवेंद्र फडणवीस यांचा स्वर लाभला आहे. असे रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी सांगितले.

Director Ramkumar Shedge

Ramkumar Shedge Director Debut Aa Bb Kk 03

On Set of ‘अ.ब.क'

Ramkumar Shedge Director Debut Aa Bb Kk 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement