Exclusive
Typography

देवाचं अस्तित्व खरंच आहे की नाही? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक काय? आस्तिक असणं योग्य आहे की नाही? समाजामध्ये सुरु असलेल्या या द्वंद्वावर भाष्य करणाऱ्या झी युवा या वाहिनीवरील 'देवाशप्पथ' या मालिकेतील श्लोक म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा नास्तिक आहे. त्याचा घरच्यांचा अति देव-देव करणं त्याला अजिबात पटत नाही. हरिपूर या गावातील ही कथा असून क्रिश हा आधुनिक कृष्ण भगवान नास्तिक श्लोकची मदत करायला मानव रुप धारण करून येतो. अहंकारी व नास्तिक असलेला श्लोक आणि त्याचे देवावर अतिशय श्रध्दा असणारे पुजारी वडील, विश्वासराव यांच्यात समतोल साधण्याचा तो प्रयत्न करत आहे.

या मालिकेतील व्यक्तिरेखा जरी गंभीर असल्या तरी त्यातील कलाकार मात्र त्यांच्या व्यक्तिरेखेच्या अगदी विरुद्ध आहेत. कृष्ण देवाची आणि लक्ष्मीची भूमिका साकारत आहेत क्षितिज दाते आणि अमृता देशमुख. देवाचीभूमिका साकारत असले तरी ते खऱ्या आयुष्यात खूपच मजेदार आणि विनोदी आहेत. नुकतेच अमृताने तिच्या सोशल मिडीयावर क्षितिज सोबत एक फन म्युझिकली व्हिडीओ अपलोड केला आणि नेटिझन्सनी त्याला खूप चांगला प्रतिसाद देखील दिला. अमृता आणि क्षितिष सारखेच कौमुदी आणि संकर्षण सुध्दा असेच खोडकर आहेत. सेटवरील अनेक लोक क्षितिष आणि संकर्षणला दुसरीतले विद्यार्थी म्हणतात कारण ते प्रचंड खोडकर आहेत आणि सेटवरील प्रत्येकाची खोडी काढतात. कौमुदी, संकर्षण आणि अमृता हे तिघेही ५ वर्षांपासून मित्र आहेत आणि त्यामुळे त्यांची वेगळीच बॉंडिंग आहे.

Amruta Deshmukh Laxmi Deva Shappath 01

सेटवरील मजामस्तीविषयी सांगताना अमृता देशमुख म्हणाली, "सेटवर आमचे एक विशेष नाते तयार झाले आहे आणि आम्ही आमचा फावला वेळ अंताक्षरी खेळण्यात किंवा संकर्षण आणि क्षितिज यांच्या विनोदावर हसण्यात घालवतो. ते दोघेही सेटवरील लहान मुलं आहेत आणि ते सह-कलाकारांपासून ते स्पॉट दादांपर्यंत सर्वांच्या खोड्या काढत असतात. ते दोघे अवतीभोवती असताना आम्हाला कधीच सेटवर कंटाळा येत नाही. आम्ही सर्वजण एकत्र असताना मला माझा वेळ कसा जातो ते कळतच नाही." तिच्या पात्रा विषयी बोलताना तिने सांगीतले, "मी माझ्या खऱ्या आयुष्यात अतिशय फनलविंग आहे. लक्ष्मीची भूमिका साकारत असून सुध्दा पौराणिक संदर्भात जास्त भर दिलेला नसून त्या पात्राकडे जास्त कल दिला आहे. प्रेक्षकांना मालिकेमधील माझी वेशभूषा आणि माझं काम आवडतंय आणि ते मला अजून चांगले काम करण्यासाठी प्रेरणादायी आहे."

Amruta Deshmukh Laxmi Deva Shappath 02

Amruta Deshmukh Laxmi Deva Shappath 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News