Exclusive
Typography

६ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या ‘यंग्राड’ या बहुचर्चित मराठी चित्रपटात प्रख्यात बॉलिवूड कलाकार शरद केळकर याचीही महत्वाची भूमिका आहे. या अत्यंत गुणवान अशा कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विविधांगी भूमिकांनी स्वतःची अशी वेगळी छाप पाडली आहे. मोहन्जो दारो, हलचल, रॉकी हँडसम, सरदार गब्बर सिंग आणि बादशाहो या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका वटवल्या होत्या. मकरंद माने दिग्दर्शित ‘यंग्राड’मध्ये त्याची तशीच भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आजही कित्येकांना माहित नाही की, शरदने ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये मध्यवर्ती व्यक्तिरेखेतील प्रभासला व्हॉइस ओव्हर दिला होता. शरद केळकर यांनी ‘रॉकि हँडसम’मध्ये साकारलेला एसीपी दिलीप सानगोडकर, ‘मोहन्जो दारो’मधील सुर्जन, ‘भूमी’मधील धौली, ‘बादशाहो’मधील इन्सपेक्टर दुर्जन या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडून फार मोठा प्रतिसाद मिळाला.

चित्रपटाची जी अनेक आकर्षणे आहेत त्यांमध्ये शरदने साकारलेल्या भूमिकेचाही समावेश आहे. त्यामुळेही मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपटाबद्दल चर्चा आहे. "‘यंग्राड’मधील माझी भूमिका अत्यंत अर्थपूर्ण अशी आहे. मला पूर्ण खात्री आहे की माझ्या हिंदी चित्रपटांमधील भूमिकांप्रमाणेच प्रेक्षक या मराठी चित्रतातील माझी भूमिकाही डोक्यावर घेतील,” तो म्हणतो.

"या सगळ्या मुलांसोबत काम करताना मला मजा आली. मी या चित्रपटाबद्दल एवढेच सांगेन की ही फिल्म प्रत्येक पालकाने बघितली पाहिजे, कारण मुलांच्या या वयात आपण त्यांच्याशी कसे वागले पाहिजे हे त्यांना यातून कळेल. आणि तरुण मुलांनीपण हा चित्रपट बघितला पाहिजे जेणेकरून आपण तरुण वयात मस्करीत एखादी मस्ती करतो. नंतर ती मस्ती त्यांना चुकीच्या ठिकाणी घेऊन जाते आणि त्याचे परिणाम पुढे काय होतात हे त्यांना समजेल. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद मानेच्या या चित्रपटात मी सगळ्यांना एका वेगळ्या भूमिकेत दिसेन." असेही शरद केळकर म्हणाला.

Youngraad Trailer Launch 01

राष्ट्रीय पुरस्कार विजेते मकरंद माने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मकरंद यांना कथा वेगळ्या अंगाने आणि साचाबाहेर जाऊन सांगण्याची हातोटी आहे. ते ‘यंग्राड’च्या माध्यमातून आणखी एक अनोखा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रकाशित करण्यात आला.

या चित्रपटाची निर्मिती विठ्ठल पाटील (विठ्ठल पाटील प्रॉडक्शन), गौतम गुप्ता, गौरव गुप्ता (फ्युचरवर्क्स मिडिया लिमिटेड) आणि मधु मंटेना (फँटम फिल्म्स) यांची आहे. ‘यंग्राड’चे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले असून यात चार युवा कलाकारांना संधी देण्यात आली आहे. चैतन्य देवरे, सौरभ पाडवी, शिव वाघ आणि जीवन कराळकर यांनी यातील मध्यवर्ती भूमिका पार पाडल्या आहेत. त्याशिवाय चित्रपटात शरद केळकर, सविता प्रभुणे, शिरीन पाटील, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, विठ्ठल पाटील आणि शंतनू गणगणे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा मकरंद माने यांनी लिहिली असून त्यांनी पटकथा शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांच्याबरोबर संयुक्तपणे लिहिली आहे. युवा हृदय गट्टानी आणि गांधार यांनी संगीत दिले आहे. यातील गाणी क्षितीज पटवर्धन, दत्ता पाटील आणि माघलुब पूनावाला यांनी लिहिली आहेत. यातील चार गाणी शंकर महादेवन, दिव्या कुमार, शाश तिरुपती आणि हृदय गुलाटी यांनी गायली आहेत.

‘यंग्राड’ हा आडदांड मुलांसाठी नाशिक म्हणजे ज्या भागाला भारताचे दक्षिण काशी (दक्षिणेकडील बनारस) म्हटले जाते तेथील बोली भाषेत वापरला जातो. एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे असो की आपल्या मित्राच्या प्रेमप्रकरणाला योग्य वळण देणे असो, हे चारही मित्रांनी एकमेकांना उत्तम सहकार्य करत आले आहेत. पण आपल्या संस्कारक्षम वयात ही मुले चुकीचे आदर्श पाळतात आणि मग त्यातून अडचणीत सापडतात. त्यातून त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. अशावेळी त्यांना जाणवते की, आयुष्याची सर्व माहिती आपल्याला असल्याचे जे त्यांचे मत आहे ते साफ फोल आहे. त्यातून मग त्यांचा स्वतंत्र प्रवास सुरु होतो आणि ते स्वत्वाच्या शोधात निघतात, अशी ही कथा आहे.

Youngraad Trailer Launch 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement