Exclusive
Typography

जुई गडकरी - माझ्यासाठी मैत्री म्हणजे स्वत:चं अस्तित्व टिकवून स्वत:च्या भावना व्यक्त करता येणं, ज्यामध्ये खोटेपणा आणि शंकेला जागा नसेल. आणि एकमेकांच्या विचारात स्पष्टता असणे, कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्या सोबतीला कायम आधार म्हणून उभे राहणे हे देखील मैत्रीचं एक कर्तव्य असतं.

माझे बरेच मित्र-मैत्रिणी आहेत पण मी सगळ्याकडे व्यक्त नाही होत किंवा मी सगळंच सगळ्यांशी शेअर करते असं नाही आणि इंडस्ट्रीमध्ये कोणा एका व्यक्तीवर विश्वास ठेवणे फार कठीण. माझ्या आयुष्यात मी कमावलेला माझा खरा मित्र म्हणजे प्रसाद लिमये. गेल्या ८ वर्षांपासून आमची खास मैत्री आहे आणि माझा प्रत्येक वर्षीचा फ्रेण्डशिप डे हा माझा जिवलग मित्र प्रसाद यासाठी असतो.

Jui Gadkari Prasad Limaye 03

Jui Gadkari Prasad Limaye 02

Jui Gadkari Prasad Limaye 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement