Exclusive
Typography

संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ 'संगीत सम्राट पर्व २' ने उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रेक्षक जरी दुसऱ्या पर्वाच्या रुपरेषेत काही बदल अनुभवत असले तरी परीक्षक म्हणून आदर्श शिंदे यांची जागा दुसऱ्या पर्वात देखील कायम आहे.

पहिल्या पर्वापासून आदर्श शिंदे एक उत्तम परीक्षक बनून स्पर्धकांना योग्यरीत्या मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांचा महत्वपूर्ण प्रतिसाद आणि त्यांच्या अनुभवातून स्पर्धक खूप काही शिकू शकतात. दुसऱ्या पर्वात देखील प्रेक्षकआदर्श शिंदे यांच्या परीक्षकाच्या भूमिकेला पसंती दर्शवत आहे, मग ती आदर्श शिंदे यांना परफॉर्मन्स आवडल्यानंतर त्यांनी दिलेली शिंदे शाही सलामी असो किंवा स्पर्धकांना दाद देताना त्यांनी म्हंटलेलं 'आवाज वाढव परफॉर्मन्स'असो, आदर्श शिंदे यांची परिक्षणाची ही हटके स्टाईल प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. आदर्शच्या परीक्षणाच्या स्टाईलसोबतच त्याचा फॅशन सेन्स देखील सर्वांना आवडतो आहे.

आदर्श दुसऱ्या पर्वात त्याच्या स्टाईल सोबत एक्सपेरिमेंट करताना दिसत आहे. सर्व फॅशन ट्रेंड्स बाजूला करून आदर्श स्वतःची अशी वेगळी स्टाईल निर्माण करत आहे. या पर्वात आदर्श ब्राईट कलरचे आऊटफिट आणि त्यासोबत कॉम्प्लिमेंट करेल असे बूट परिधान करतो, तसेच त्याचे ट्रेंडी आऊटफिट तितक्याच आत्मविश्वासाने कॅरी देखील करतो.

त्याच्या स्टाईल सेन्सबद्दल बोलताना आदर्श म्हणाला, "माझ्या मते फॅशनची अशी काही निश्चित परिभाषा नाही आहे. मी माझ्या मूड आणि कम्फर्टप्रमाणे ड्रेसअप होतो. माझ्या कॉश्यूम डिझायनरला माझी स्टाईल खूप चांगल्यारित्या समजली आहे. मला बोल्ड आणि ब्राईट ड्रेसिंग स्टाईल आवडते. अनोखे पॅटर्न्स, सुंदर रंग आणि ट्रेंडी स्टाईल या सगळ्याच कॉम्बिनेशन आहे माझा फॅशन मंत्र."

Adarsh Shinde Style 01

Adarsh Shinde Style 02

Adarsh Shinde Style 03

Adarsh Shinde Style 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement