Exclusive
Typography

प्रत्येक स्त्रीला आकर्षण असते दागिन्यांचे आणि या वाक्याशी अनेकजण सहमत असतील. ग्राहकांच्या सर्वप्रथम पसंतीस पडणारे सराफ म्हणजे पीएनजी गाडगीळ. ग्राहकांची आवड-निवड अगदी बारकाईने जपून त्यांना आवडतील असे आणि त्यांना शोभतील असे दागिन्यांमधील डिझाईन्स बनवून पीएनजी ज्वेलर्स हा सुप्रसिध्द ज्वेलरी ब्रँड बनला आहे. सर्वांची आवडती मराठमोळी आणि बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दिक्षित ही ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ब्रँड ऍम्बॅसेडर आहे. माधुरी दिक्षितने पीएनजी गाडगीळच्या ‘टाईमलेस डायमंड्स बाय माधुरी’या अंतर्गत असलेल्या डायमंडच्या डिझाईन्स लॉन्च केल्या. आता सर्वत्र अशी चर्चा आहे की माधुरी नंतर हिंदी-मराठी अभिनेत्री रीना अगरवाल ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ब्रँड ऍम्बॅसेडर बनणार आहे का?

Reena Aggarwal PNG Jewellers Shoot Photo 01

या चर्चेचं कारण असं की अभिनेत्री रीना अगरवालने ‘पीएनजी ज्वेलर्स’साठी फोटोशूट केलं आहे. प्रिंट आणि होर्डिंग्ससाठी असणारे हे फोटोशूट मुंबई आणि पुणे येथे प्रकाशित होणार आहे. महाराष्ट्रातील स्त्रियांचा आवडता पेहराव म्हणजे साडी आणि त्यातही विशेष म्हणजे पैठणी. भर जरी पैठणीवर शोभून दिसेल असे दागिने आणि नवनवीन डिझाईन्स ग्राहकांसाठी आणण्याची कल्पना पीएनजी ज्वेलर्स यांना सुचली आणि महिलांची आवड लक्षात घेता लवकरच नवीन कलेक्शन ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहेत. तर पैठणी साड्यांसाठी पीएनजीचे नक्षी कलेक्शनच्या जाहिरातीसाठी पीएनजी ज्वेलर्सनी आपल्या मराठमोळ्या रीना अगरवालला प्राधान्य देऊन तिच्यासोबत असोशिएट झाले. आणि याच निमित्ताने रीनाचा चाहता वर्ग रीना अगरवाल पीएनजी ज्वेलर्सची ब्रँड ऍम्बॅसेडर बनावी अशी आशा नक्कीच करत असेल.

Reena Aggarwal PNG Jewellers Shoot Photo 02

‘पीएनजी ज्वेलर्स’सोबत असोशिएट झाल्याविषयी आपले मत व्यक्त करताना रीना अगरवालने म्हटले, “पी. एन. गाडगीळ आणि माझे कुटुंब यांचे खूप जुने नातेसंबंध आहे. सणासुदीला किंवा घरातील कार्यक्रमाला सोन्याची खरेदी म्हटली की माझ्या कुटुंबातील सदस्यांनी नेहमीच ‘पीएनजी ज्वेलर्स’ला सर्वप्रथम प्राधान्य दिले आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे माझा आणि माझ्या कुटुंबाचा ‘पीएनजी ज्वेलर्स’वर असलेला विश्वास. त्यामुळे लहानपणापासून माझं स्वप्न किंवा मनात एक इच्छा कायम होती की ‘पीएनजी ज्वेलर्स’साठी काम करण्याची संधी मिळावी आणि ‘नक्षी कलेक्शन’ मुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली. नुकतेच मी ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या नवीन नक्षी कलेक्शनसाठी फोटोशूट केलं आहे आणि ते स्त्रियांच्या पसंतीस नक्की पडेल असे हे कलेक्शन नवरात्री आणि दिवाळीत उपलब्ध होईल.”

Reena Aggarwal PNG Jewellers Shoot Photo 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement