Exclusive
Typography

देश, विदेशात अनेक गायनाचे कार्यक्रम केले, पण त्यात गल्फ कंट्रीतील कार्यक्रमांचे वैशिष्ट्य काही औरच. आपल्या महाराष्ट्रासारखी आपुलकी, पाहुणचार, ‘अतिथि देवो भव’चा आलेला अनुभव आणि सातासमुद्रापारही मिळणार उत्तम अस महाराष्ट्रीयन अर्थात घरच जेवण, या सार्‍यांनी आम्ही अगदी भारवतो. पण विशेष कौतुक वाटते ते विदेशात राहुनही आपल्या संस्कृती कटाकाक्षाने जपणार्‍या व आपल कुणी भेटल्यावर त्याला लगेच आपलस करणार्‍या आपल्या लोकांचं. येथे पोषाखापासून ते जेवणापर्यंत प्रत्येक बाबतीत आपली परंपरा सांभाळली जाते. हे अनुभव सांगतेय प्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार.

Madhurra Kumbhar Gulf Tour 02

मधुराने कुवेत, कतार, दुबई, यासह अनेक देशांमध्ये गायनाचे कार्यक्रम सादर केले आहे. नुकताच तिचा विदेश दौरा आटोपला. मधुरा सांगते, "गल्फ कंट्रीमध्ये मराठी लोक खूप आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचे महाराष्ट्र मंडळ आहे. भारतातून आलेल्या लोकांचे येथे फार अपृप असते. ही माणसे आपल्या देशापासून दूर असतात, त्यामुळे आपली संस्कृती जपण्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतात. अर्थात त्यांना मर्यादा येतात पण त्यातूनही मार्ग काढून ते आपले सण व आपले प्रत्येक महत्त्वाचे दिवस येथे उत्तमप्रकारे साजरे करतात. आपण जितकं इकडे करत नाही तितक्या उत्साहात ते प्रत्येक सण साजरा करीत असतात. आम्ही जेव्हा तेथे गेलो तेव्हा आम्हाला अगदी घरच्यासारखी वागणूक मिळाली. आम्हाला वाटतच नव्हतं की आम्ही सातासमुद्रापार आपल्या देशापासून दूर आलो आहोत ते. आम्हाला घरचे जेवण मिळावे यासाठी त्या लोकांचे प्रयत्न, येथे महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट खूप आहे, उत्तम प्रकारचे अगदी घरचे जेवण येथे मिळते. तिथल्या लोकांची आपल्या लोकांबद्दलची आत्मियता अगदी जवळून अनुभवयाला मिळाली. अर्थात गाण्याचा उत्साहही येथे मोठा असतो. व्यासपीठ मोठे, लूकपासून ते माहोलपर्यंत सर्वच गोष्टींची खूपच मजा. गाण्यासाठी सिस्टीमही उत्तम, त्यामुळे गाण्याची मजा दुप्पट. गाणं ही माझी पॅशन आहे सातासमुद्रापारही त्याचं कौतुक होणं यापेक्षा दुसरं समाधान नाही. त्यातच येथे मिळालेला मानसन्मान व पाहुणचार हा कायम लक्षात राहणारा आहे."

Madhurra Kumbhar Gulf Tour 04

मुंबई विद्यापीठातून मधुराच्या गायनाचा प्रवास सुरू झाला. अनेक चित्रपट, नाटकांमध्ये गाणे गायिले, तिच्या आवाजाचे सर्वत्र कौतुक झाले. कलर्स वहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात तिने एक वेगळी छाप सोडली. ठसकेबाज लावणी असो की वेस्टर्न साँग, अशा वेगवेगळ्या शैलीतील वेगवेगळ्या गीतांनी तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेे. प्रत्येक वेळी जजेसची थाप मिळविली होती. त्यानंतर छोटे सूरविर कार्यक्रमासाठी जजची भूमिका बजावली. यासह झी युवा वरील संगित सम्राट या संगितमय कार्यक्रमात हुकुमी एक्का या नव्या भूमिकेत तिने स्पर्धकांना साथ दिली. या कार्यक्रमातही तिच्या आवाजाचे कौतुक झाले. आजवर अनेक भूमिकांमधून आपल्या समधुर आवाजाने मधुराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.. विदेशातही तिने अनेक कार्यक्रम सादर करून दाद मिळविली आहे. विशेष बाब म्हणजे मधुराने ‘मधुरा कुंभार लाईव्ह’ या कार्यक्रमाचे अनेक शहरांमध्ये सादरीकरण केलेले आहेच, पण आता मधुरा हा कार्यक्रम विदेशातही घेण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच विदेशात तिचा हा प्रोजेक्ट सुरू होणार आहे. तिच्या गाण्यांच्या प्रवासातील या उत्तुंग भरारीसाठी व तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी तिला खूप सार्‍या शुभेच्छा.

Madhurra Kumbhar Gulf Tour 03

Madhurra Kumbhar Gulf Tour 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement