Exclusive
Typography

बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत एकदा नोकरी लागली की, ती व्यक्ती एका वेगळ्या विश्वाचा भाग बनते आणि आपल्या मातीशी असलेली नातं विसरतात असे दिसते. मात्र आगामी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री मालविका गायकवाड याला अपवाद ठरली आहे. मोठ्या पगाराची नोकरी करत असताना तिने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, पुढे स्वतः सेंद्रीय शेतीचा प्रयोग करायला लागली आणि आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या, प्रविण तरडे दिग्दर्शित आगामी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर येत आहे.

आयटी इंजिनिअर ते आधुनिक शेतकरी या प्रवासाबद्दल बोलताना मालविका म्हणाली, "शेतीशी माझा कधी प्रत्यक्ष संबध आला नाही, मात्र वडील मार्केटयार्डमध्ये ट्रेडर होते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे संबंध होता. अभ्यासात हुशार असल्याने आयटी मध्ये जायचे हे माझे निश्चित होते. इंजिनियरिंगला अभ्यास आणि दैनंदिन आयुष्य छान सुरु होतं. नियमित वर्तमानपत्र, मॅगझिन्स वाचायची सवय असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या नेहमी नजरेखालून जायच्या. त्यातून या विषयी अधिक माहिती करून घेतली. माझ्या मनात हे सर्व विचारांचे वादळ सुरु असताना मी इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. नंतर मला चांगल्या आयटी कंपनी मध्ये जॉब लागला."

Mulshi Pattern Actress Malvika Gaekwad 02

"जॉब सुरु असताना सुद्धा माझा मनात शेतीविषयी असणारी ओढ कमी झालेली नव्हती. यातूनच मी घरच्यांना माझ्या डोक्यातील सेंद्रिय शेतीच्या उपक्रमाबद्दल बोलून दाखवले. त्यांनी पण मला थोडी जमीन घेऊन दिली. मग त्यात मी माझी नोकरी सांभाळून विविध कृषिविषयक प्रयोग करू लागले. नोकरीला एक दीड वर्षे झाल्यानंतर माझे मन आयटी क्षेत्रात रमेनासे झाले. दुसरीकडे शेतीबाबत कार्य केल्यावर मला पूर्ण वेळ शेती करण्याची तीव्र इच्छा होत होती. थोड्या विरोधानंतर घरच्यांनी देखील माझे म्हणणे मान्य केले. पण ‘वर्षभरात शेतीत तुझी प्रगती दिसायला हवी नाहीतर परत आयटी मध्ये काम करावे लागेल’, अशी तंबी देखील दिली."

Click Here to Watch "Un Un" Song from Mulshi Pattern

"याच काळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटासाठी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली. मात्र यापूर्वी मी कधीच अभिनय केलेला नव्हता, अगदी शाळेत सुद्धा नाही. पुढे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी २ ते ३ महिने मला माझ्या भूमिकेसाठीचे, अभिनयाचे अनेक बारकावे शिकवले. यातूनच मी माझी व्यक्तिरेखा साकारली आहे. सेटवर मी कम्फरटेबल होते. मात्र आम्ही बहुतांश शुटिंग रिअल लोकेशन्सवर केल्याने सर्वच ठिकाणी लोकांची गर्दी असायची, त्यावेळी मला अभिनय करताना अवघडल्यासारखे व्हायचे मात्र सहकलाकारांच्या सहकार्यामुळे मी त्यावर मात केली. अभिनयाची पार्श्वभूमी नसताना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली यापेक्षा ‘मुळशी पॅटर्न’ या शेतकऱ्यांच्या समस्या मांडणाऱ्या बिगबजेट चित्रपटाचा मी भाग होऊ शकले याचा मला अधिक आनंद आहे."

Mulshi Pattern Actress Malvika Gaekwad 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement