Exclusive
Typography

झी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव!

Zee Yuva Actress Makar Sankrant Wishes 01

हृता दुर्गुळे (फुलपाखरू - झी युवा)

मला तिळगुळ खूप आवडतात आणि ते मुख्यतः मकर संक्रांतीला खायला मिळतात . तीळ आणि गूळ यांचे लाडू आणि वड्या माझ्या घरी दरवर्षी बनवल्या जातात. हा सण साजरा करण्यामागे, भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे आई म्हणते. माझा वैत्रानिक दृष्टीकोन म्हंटला तर . तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तसेच गुळातही उष्णता असल्याने या लाडूचे महत्व वेगळे आहे. माझ्या सर्व चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि एकंच मागणं तिळगुळ खा आणि गोड गोड बोला !!

Zee Yuva Actress Makar Sankrant Wishes 02

जुई गडकरी (वर्तूळ - झी युवा)

मी एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे प्रत्येक सण हा माझ्यासाठी अविस्मरणीय असतो. मी चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे यंदा मी संक्रांत 'वर्तूळ' मालिकेच्या परिवारासोबत साजरा करणार आहे. मी सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते. मी फक्त माझ्या चाहत्यांना एक मेसेज देऊ इच्छिते कि पतंग उडवताना मांजा वापरू नका. सणामुळे पर्यावरणाला आणि प्राण्यांना त्रास नाही झाला पाहिजे.

Zee Yuva Actress Makar Sankrant Wishes 03

तितिक्षा तावडे (तू अशी जवळी राहा - झी युवा)

मी गोव्याला ३ वर्ष शिकायला होते आणि मला संक्रांतीला सुट्टी मिळत नव्हती, त्यामुळे माझ्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींनीच माझ्यासोबत संक्रांत साजरी केली. त्यांनी पंतग आणले आणि आम्ही मग टेरेसवर जाऊन पतंग उडवले. आमच्या कॉलेजमधील वेगवेगळ्या प्रांतातले विद्यार्थी देखील आमच्या सेलिब्रेशनमध्ये शामिल झाले. सणाचं खरं महत्व हेच असतं की लोकांनी एकत्र येऊन सण साजरा करावा आणि तसाच काहीसा अनुभव मला त्यावेळी आला. दरवर्षी मी आईला तिळाचे लाडू बनवायला मदत करते. यावर्षी चित्रीकरणामुळे ते शक्य होणार नाही आहे. पण 'तू अशी जवळी राहा' या मालिकेत माझी लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे आणि त्यामुळे मी माहेरी जाणार आहे आणि पहिलीच संक्रांत असल्यामुळे मला हलव्याचे दागिने वगैरे घालून मला सजवणार आहेत. जरी खऱ्या आयुष्यात काही कारणांमुळे सण साजरा करायला नाही मिळाला तरी मालिकेच्या निमित्ताने सण साजरे करायला मिळतात. मी फक्त माझ्या चाहत्यांना इतकंच सांगू इच्छिते की पर्यावरणाची काळजी घ्या आणि सणाचा आनंद पसरवा.

Zee Yuva Actress Makar Sankrant Wishes 04

खुशबू तावडे (आम्ही दोघी - झी युवा)

मुंबईपेक्षा संक्रांत ही गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. मी जेव्हा ३ वर्ष शिकायला अहमदाबादला होते, तेव्हा तिथे काईट फेस्टिवलची मजा मी अनुभवली आहे . तिथे खूप मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येऊन संक्रात साजरी करतात. माझी लग्नानंतरची ही पहिलीच संक्रांत आहे त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. माझं सासर हे कोल्हापूरमध्ये असल्यामुळे तिथे संक्रांत कशी साजरी करतात हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. 'आम्ही दोघी' च्या चित्रीकरणातून जसा वेळ मिळेल तसा मी हा सण साजरा करणार आहे. प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही शास्त्र असतं.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement