Exclusive
Typography

झी मराठीवरील वरील लागिरं झालं जी या मालिकेतून घराघरात पोहचलेली जयडी म्हणजेच अभिनेत्री किरण ढाणे प्रेक्षकांना लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. किरणने काल तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर २ विडिओ पोस्ट केलेत. या व्हिडिओमध्ये ती मुंबईला येत असल्याचे म्हंटल आहे. तसंच ती का मुंबईला येतेये हे guess करायला सांगितले आहे.

किरणच्या या व्हिडिओवरून तिचा नवीन प्रोजेक्ट बद्दलची चर्चा रंगली आहे. सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार किरण सोनी मराठी वरील एका नव्या मालिकेत दिसणार आहे. पण ही मालिका कोणती? त्यामध्ये किरणचा रोल काय असणार या बद्दल पक्की माहिती मिळाली नाही. पण लवकरच ती छोट्या पडद्यावर दिसणार हे मात्र नक्की आहे.

Watch Kiran's Videos Here

अभिनेत्री किरण ढाणे या आधी झी मराठीवरील लागिरं झालं जी या मालिकेत दिसली होती. त्या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना अतिशय आवडली होती. पण मानधनावरवरुन झालेल्या वादामुळे जयडीने मालिकेतून exit घेतली. पण आता पुन्हा किरण प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही.

तुम्हाला काय वाटते तिच्या मुंबईत येण्याचं कारण आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)