Exclusive
Typography

अखेर तो क्षण येतो. एकिकडे करिअर उभं असतं आणि एकिकडे प्रेम बेंबीच्या देठापासून साद घालत असतं. अशावेळी करावं काय? एक मन म्हणत असतं आधी करिअर करायला हवं. करिअर केलं पैसे हाती आले की मग बाकी सगळं होतं आपोआप. तर दुसरं मन म्हणत असतं, आत्ता जे प्रेम आहे ते आधी काबीज करू. एकदा हा गड काबीज झाला की मग करिअर करायचं आहेच. प्रेम काय पुन्हा पुन्हा मिळत नसतं. मनाची पुरती त्रेधा उडालेली असते. मुलगा असो किंवा मुलगी.. दोघांच्या मनातली ही घालमेल सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा अवस्थेला येऊन पोचलेली असते. मग अशावेळी करावं काय?

Readymix Marathi Film Still Photo 01

नेमक्या याच टप्प्यावर हवा असतो एक जोडीदार. अहं.. जोडीदार म्हणजे पुन्हा प्रेमातला नव्हे. तर मैत्रीतला. मैत्री काय फक्त मित्रांची नसते. त्यात दोन भाऊ, दोन बहीणी.. अगदी आई आणि मुलगा.. बाप आणि मुलगी.. किंवा कसंही काॅम्बिनेशन करा.. त्यांची मैत्री होते आणि तयार होतं एक अनोखं रेडीमिक्स. आणि ते रेडीमिक्स तुम्हाला या गर्तेतून बाहेर काढतं. अगदी असंच रेडीमिक्स आहे आपल्याकडे. त्यासाठी तुम्हाला थोडी तसदी घ्यावी लागेल. जवळच्या थिएटरमध्ये जाऊनच या रेडीमिक्सचा आस्वाद घ्यावा लागेल. आम्हाला खात्री आहे, तुम्हाला या रेडीमिक्सचा फायदा होईल. करिअर आणि प्रेमाच्या या वळणावरून तुन्ही सुखरूप प्रवास करून तुमच्या इप्सीत स्थळी पोहोचाल.

Readymix Marathi Film Still Photo 02

जगण्यात प्रेम आणि करिअर एका तराजूत तोलायला हरकत नाही. पण, प्रेमाचा करिअरवर आणि करिअरचा प्रेमावर अजिबात परिणाम होणार नाही याची खबरदारी आपणच घ्यायला हवीय. प्रेमात अटी-शर्थींचे, हक्क दाखवण्याचे वा डावलण्याचे कसलेच बंधन नसावे. आपल्या जोडीदाराचे अस्तित्व आपण अबाधित ठेवलं की आपलं नातं अधिक घट्टपणे रूजतं. या रूजलेल्या नात्याला रेडिमिक्सची जोड मिळाली तरच ते अधिक बहरेल, तुमचं जगणं फुलवायचं असेल तर या रेडिमिक्सला पर्याय नाही.

रेडीमिक्स’ येत्या ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement