Exclusive
Typography

झी युवावरील सूर राहू दे मधील प्रमुख भूमिका निभावणारा अभिनेता संग्राम साळवी आणि आम्ही दोघी मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हे दोघे गेल्यावर्षी लग्नबेडीत अडकले. खुशबू आणि संग्राम यांनी लग्न करून त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. ही दोघं म्हणजे चाहत्यांची आवडती जोडी आहे आणि ते नेहमीच या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करतात. व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजे प्रेमी युगुलांचा दिवस आणि नवीन लग्न झालेले खुशबू आणि संग्राम यांचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेन्टाईन्स डे पण तितकाच खास असेल यात शंकाच नाही.

Actor Sangram Salvi Actress Khushboo Tawde 04

"खुशबूने माझ्यासाठी मालिका सोडली त्याच क्षणी मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला" - संग्राम साळवी

या व्हॅलेन्टाईन्स डे निमित्ताने खुशबू आणि संग्राम यांनी त्यांची लव्हस्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली. संग्राम आणि खुशबू यांच्या मालिकांचे सेट आसपासच होते, त्यामुळे त्या दोघांची तोंडओळख होती. पण खुशबूच्या मनात संग्रामबद्दची इमेज काही खास नव्हती. त्याला खूप ऍटिट्यूड आहे असं खुशबूला वाटायचं. त्यानंतर त्या दोघांनी एकत्र एका मालिकेत काम केलं. तेव्हा संग्रामबद्दल खुशबूचं मत बदललं आणि त्यांच्यात मैत्री झाली. जर खुशबूचं लग्न मालिकेत संग्रामसोबत झालं नाही तर ती मालिका सोडेल अशी ताकीद खुशबूने मालिकेच्या मेकर्सना दिली होती आणि कथानकामधील काही बदलामुळे खरंच खुशबूचं लग्न संग्रामशी झालं नाही आणि खुशबूने ती मालिका सोडली. त्याक्षणी संग्रामने ठरवलं की मालिकेत नाही पण खऱ्या आयुष्यात तो खुशबूशीच लग्न करणार आणि त्याने खुशबूला लग्नाची मागणी घातली.

Click Here for Sangram Salvi & Khushboo Tawde Marriage Photos

संग्राम आणि खुशबूची लव्हस्टोरी देखील त्यांच्यासारखीच अनोखी आणि सुंदर आहे.

Actor Sangram Salvi Actress Khushboo Tawde 02

Actor Sangram Salvi Actress Khushboo Tawde 03

Actor Sangram Salvi Actress Khushboo Tawde 05

Actor Sangram Salvi Actress Khushboo Tawde 06

Actor Sangram Salvi Actress Khushboo Tawde 07

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like