Exclusive
Typography

मध्यरात्री झोपेत असताना तुमच्या छाताडावर कधी भूत बसलय आणि त्यानं तुमचा श्वास कोंडलाय का..? एखाद्या उंच कड्यावर जोरात खाली पडलोय असं वाटून झोप मोडलीये का..? भीतीने गलितगात्र झाल्यावर, पळून जावसं वाटत असताना पायाचं बोट सुद्धा हलवता येत नाहीये का..? जोरात किंचाळावसं वाटत असताना तोंडातुन एक शब्दही फुटत नाहीये का..? आपण एकटे आहोत हे माहिती असुनही खोलीत नक्की कोणीतरी आहे असा भास होतोय का..?

Unmatta Sleep Paralysis Marathi Film 02

तुम्हाला असं कधी झालं असेल तर घाबरु नका ते नॉर्मल आहे. हे असे अनुभव प्रत्येकालाच काही सेकंदापासून ते काही मिनीटांपर्यंत येऊ शकतात.. बऱ्याचदा ही भुतबाधा आहे असं समजुन त्यावर उ्पाय शोधले जातात. पण यात अमानवीय असं काहीच नसून ती "स्लीप पॅरॅलीसीस" नावाची एक अवस्था असते. याचं मुख्य कारणं अपुरी किंवा अनियमीत झोप आणि मानसिक ताणतणाव असतात. आपली स्वप्न हा आपल्याच विचारांचा परिपाक असतो. आपले विचार आणि सुप्त इच्छा कधी आणि कशा स्वरुपात आपल्याच स्वप्नात आपल्यापुढे उभ्या ठाकतील सांगता येत नाही आणि अशा वेळी सगळं कळत असुनही फारसा कशावरच आपला ताबा नसण्याची ही अवस्था कशी असेल?

Unmatta Sleep Paralysis Marathi Film 03

"स्लीप पॅरॅलीसीस" या जराश्या वेगळ्या आणि गुंतागुंतीच्या विषयावर लेखक दिग्दर्शक श्री महेश राजमाने यांनी "उन्मत्त" या चित्रपटाची गोष्ट बांधलीये. महेश राजमाने यांना ‘स्लीप पॅरालिसीस’चा अनाकलनीय अनुभव आल्यावर याचा खोल अभ्यास त्यांनी केला आणि त्यांच्या याच अनुभवावर आधारित “उन्मत्त” या चित्रपटाची कथा लिहिली आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. स्वप्नांचे आभासी जग आणि प्रत्यक्ष जग, जगाची उत्पत्ती, देव अन दानव, प्रेम आणि प्रतिशोध या सर्व संकल्पनांचा उहापोह या चित्रपटात असून, साय-फाय हॉलीवूडपटाच्या धर्तीवर बनलेला हा बनलेला हा मराठी चित्रपट, वेगळ्या विषयावरचे चित्रपट पाहणाऱ्या, तमाम मराठी-अमराठी प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल, असा विश्वास राजमाने यांना आहे.Unmatta Sleep Paralysis Marathi Film 04

कथेचं बीज आणि बाज ही या चित्रपटाची जमेची बाजू आहेच, पण यात वापरले गेलेले स्पेशल इफेक्ट्स आणि अंडरवॉटर सीन्स हे “उन्मत्त” या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहेत. हा अनुभव प्रत्यक्ष पडद्यावर घेताना एक नवीन जग प्रेक्षकाना उलगडेल. "उन्मत्त" २२ फेब्रुवारी पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शीत होत आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)