Exclusive
Typography

अगदीच नाही ना? खरं तर जगाच्या हृदयावर राज्य करणाऱ्या देवसेनेची अशी कुठल्यातरी विदृप माणसाशी तुलना होऊच शकत नाही. कारण एक मुर्तिमंत सौंदर्य. रेखीव चेहरा. मोहक रंगभुषा...! तर दुसरीकडे भिती आणि त्याहीपेक्षा तिटकारा वाटावा असा विदृप चेहरा.

हे दोन्ही टोकाचे चेहरे असले तरी त्यात एक गुढ साम्य आहे. दोन्ही चेहऱ्यांवर नजर खिळून राहतेय. दोन्ही चेहऱ्यांमधे एक प्रकारची ओढ आहे. एका फोटोनं अंगावर गुलाबी शहारा येतो, तर दुसऱ्यानं अंगावर काटा.

पण हे साम्य सोडूनही ह्या दोन्ही फोटोत एक गोष्ट कॉमन आहे. ह्या दोन्ही व्यक्तीरेखांचे रंगभुषाकार एकच आहेत. डी एन इरकर.

Unmatta Makeup 02

देवसेनेचा मेक-अप करण्यामधे डी एन इरकर ह्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनीच उन्मत्त ह्या मराठी साय-फाय विज्ञानपटातल्या ‘डेमन’ ह्या व्यक्तीरेखेचाही मेक-अप केलाय. उन्मत्तचं ट्रेलर पाहून ह्या डेमनची सगळीकडे प्रचंड चर्चाही होतेय.

हा मेक-अप करण्यासाठी जवळ जवळ चार ते पाच तासांचा अवधी लागत असे आणि त्यानंतर मग शूटींगला सुरवात व्हायची. त्यामुळं मेकअपमन इरकर आणि डेमन चं काम करणारा कलाकार संजय ठाकुर ह्या दोघांच्या धैर्याची आणि सहनशक्तीची परिक्षाच असायची. हे चित्रपटातली प्रमुख पात्र असल्यानं जर तेच प्रेक्षकांना पसंत पडलं नसतं तर सगळा चित्रपटच फोल ठरला असता. पण प्रेक्षकांनी हा डेमन उचलुन धरलाय आणि थिएटर ट्रेलर, युट्युबवर धुमाकुळ घालतोय. संजयनं ही व्यक्तीरेखा साकरण्यासाठी तीन महिन्यात अपार मेहनत घेऊन तब्बल १५ किलो वजन कमी केलं आणि मग ही भुमिका साकरलीये.

"उन्मत्त" २२ फेब्रुवारी पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शीत झाला आहे.

Unmatta Makeup 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)