Exclusive
Typography

‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल या व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील कुटुंबातील एक झाल्या आहेत. शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर हि खऱ्या आयुष्यात जर्मन भाषेत निपुण आहे पण मालिकेसाठी तिने सातारी भाषा शिकण्यासाठी देखील तितकीच मेहनत घेतली.

Lagira Jhala Ji Sheetal Shivani Baokar 01

मराठी भाषा दिनानिमित्त शिवानीने आपल्या मातृभाषेविषयी तिचं मत व्यक्त केलं. मराठी भाषेविषयी बोलताना शिवानी म्हणाली, "मराठी माझी मातृभाषा असल्याचा मला अभिमान आहे कारण आपली संस्कृती खूप जुनी आहे आणि अजूनही आपण ती बऱ्यापैकी जपली आहे. मुंबईत राहायचं तर मराठी आलच पाहिजे या मतची मी आहे. कारण भाषेचा अभिमान हा सगळ्यांना असावा आणि आपण आपली भाषा सोडून नवीन भाषा शिकण्यापेक्षा आपल्या भाषेबरोबर दुसरी भाषा शिकावी. माझं शिक्षण कॉन्व्हेन्ट मध्ये झालं असल्यामुळे शाळेत मराठीवर जास्त भर नव्हता. पण घरी मात्र मराठीतच बोलायचं असा मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला सांगितल होतं. अजूनही मराठीतले अवघड शब्द मी आईला फोन करून विचारते. मी इंग्लिश पुस्तकं वाचते. ह्या मराठी दिनापासून मी जरा मराठी पुस्तकही वाचायला सुरुवात करीन असा मी ठरवलय. मालिकेमुळे सातारी ही भाषा असते हे मी शिकले. शहरात अनी- पानी, घाटी, असं कोणाला चीडवण किंवा नावं ठेवणं चुकीचं आहे कारण भाषा म्हणजे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी चा एक माध्यम आहे. शुद्ध भाषा अस काही नसतं आणि कुठलीही भाषा ही भाषाच असते."

Lagira Jhala Ji Sheetal Shivani Baokar 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)