Exclusive
Typography

यातल्या राजे शब्दातल्या ‘रा’ मधे तलवार आणि ‘जे’ मधे झेंडा टाकून.. त्याचा भडक भगवा फॉन्ट करुन.. रिक्षाच्या मागे चिकटवलेला... कारवर टाकलेला.. फ्लेक्सवर छापलेला आपण नेहमी पाहतो.. पण खरं तर हेच वाक्य फ्लेक्सवर छापण्याऐवजी, ‘मनावर कोरलं जाईल’ तेंव्हा ती ख-या अर्थानं महाराजांना मानवंदना ठरेल..

पण वास्तव असं नाहीये, कारण ते तसं असतं तर आज सुखी आणि समृद्ध ‘छत्रपती शासन’ असलं असतं..

अर्थात उशीर झाला असला तरी आता ‘छत्रपती शासन’ येतय.. १५ मार्चला.. आणि जसं महाराज येण्याअगोदर ललकारी त्यांच्या आगमनाची सुचना द्यायची तसंच छत्रपती शासनचा ट्रेलर धुमाकुळ घालतोय..

हो.. ‘छत्रपती शासन’ नावाचा प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत आणि सवाई मार्तंड फिल्म्स निर्मित चित्रपट मार्च १५ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.. खरं तर आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट येऊन गेले.. पण महाराजांची कारकिर्द इतकी उत्तुंग होती की त्यांच्यावर कितीही चित्रपट निघाले तरी ते कमीच. पण ‘छत्रपती शासन’ हा फक्त महाराजांवरचा चित्रपट नाहीये, तर महाराजांना समजुन घेणारा आणि त्याहीपेक्षा ‘महाराज काय होते..?’ हे समजावुन सांगणारा चित्रपट आहे..

खरं तर छत्रपती त्यांच्या कर्तुत्वानं, त्यांच्या हुशारीनं, शौर्यानं, निर्धारानं कधीच आभाळाला भिडले होते.. पण आपण त्यांना पुतळ्यात कोंडून लहान तरी करतो किंवा देव करुन मखरात बसवून आपल्यापासून दूर करतो.. पण खरी गरज आहे ती महाराजांना समजुन घेऊन त्यांच्या विचारांना आपल्या मेंदूत उतरवण्याची.. जर असं झालं तर मग महाराजांना परत जन्म घ्यावाच लागणार नाही. कारण त्यांच्या विचारातून ते पुन्हा प्रकटले असतीलच..

‘छत्रपती शासन’ हाच मोठा विचार घेऊन मार्च १५ ला सगळीकडे प्रदर्शित होतोय.. नुसता ट्रेलर पाहूनच अंगावर शहारा येतोय तर प्रत्यक्ष चित्रपट कसा असेल ह्याचीच सगळीकडे उत्सुकता आहे..

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)