Exclusive
Typography

सिनेसृष्टीत डिजीटल प्रगती झाल्यामुळे आता भाषा, टेलिव्हिजन, चित्रपट यांच्यामध्ये काही अंतर राहिलेलं नाही. प्रादेशिक भाषेतील कलाकार आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. साऊथ आणि मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एण्ट्री करुन स्वत:ची ओळख तयार केली आहे. आणि आता हिंदीमध्ये आपली ओळख तयार करण्याची इच्छा मराठी अभिनेत्री आकांक्षा साखरकर हिची आहे. आकांक्षाने बऱ्याच मराठी चित्रपटांत आणि मालिकेत काम केलं आहे.

Aakanksha Sakharkar 04

आकांक्षा ही मूळची नागपूरची, जवळपास तीन वर्षे ती मुंबईत राहत आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये तिने नाटकांत सहभाग घेतला होता. नाटकांत तिने चार वर्ष काम केले आहे. तिने जाहिरातीत काम केलंय आणि त्याच दरम्यान तिला ‘भला माणूस’ या मराठी चित्रपटाची ऑफर आली. या चित्रपटानंतर तिने ‘अंजना’ या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकरसोबत प्रमुख भूमिका साकारली होती.

Aakanksha Sakharkar 02

नागपूरमध्ये आकांक्षा नाटकाचे शंभरहून जास्त शो केले आहेत, ‘वुमन अगेंस्ट क्राईम’साठी तिने स्ट्रीट प्ले देखील केला आहे. रॅम्प वॉकच्या शोसाठी तिने मॉडेल म्हणून काम केलं आहे. वॉटर प्युरीफायर आणि मेट्रोमोनियलसाठी टेलिव्हिजन जाहिराती देखील केल्या आहेत. तिने अनेक प्रचारात्मक व्हिडिओमधून आपली प्रतिभा दाखवली आहे. ‘मिस नागपूर क्वीन’ या किताबाची विजेती असलेली आकांक्षा ‘विदर्भ फेस ऑफ दि इयर २०१६’ या मॉडलिंग कॉम्पिटीशनमध्ये पण फायनलिस्ट होती. ‘ब्राईट परफेक्ट मिस इंडिया’यामध्ये देखील ती टॉप १० कंटेस्टंटच्या यादीत होते. वर्धमान फैंटासी इव्हेंटमध्ये ‘ब्युटिफुल स्किन’चं टायटल आकांक्षाने जिंकले आहे आणि ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन २०१७’मध्ये टॉप २०च्या लिस्टमध्ये आली होती.

Aakanksha Sakharkar 05

आकांक्षाने कलर्स मराठीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत अभिनय केला आहे आणि सध्या सोनी मराठीवरील ‘भेटी लागी जीवा’ या मालिकेत ‘स्वरा’ हे प्रमुख पात्र साकारत आहे. या मालिकेला मिळणाऱ्या यशामुळे उत्साही आणि आनंदी असणाऱ्या आकांक्षाने म्हटले की, “मालिकेला सोशल मिडीयावरुन प्रेक्षकांच्या खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. ज्या एपिसोडमध्ये मी दिसते त्या एपिसोडविषयी आणि माझ्याविषयी माझे चाहते कौतुक करतात. आणि जर कधी नाही दिसली तर त्यांचे सोशल मिडीयावर मेसेजेस येतात आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी कॉम्पलिमेंट आहे. खरं तर मालिकेचा हाच तर फायदा असतो की, दररोज मालिका घराघरांत पाहिली जाते, ज्या उलट चित्रपट एकदा प्रदर्शित होतो आणि तो थिएटरमधून एकदा का गेला की त्याला लगेच नाही पाहू शकत.”

Aakanksha Sakharkar 03

पण सध्या आकांक्षाचं संपूर्ण लक्ष हे चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या इच्छेवर आहे. जरी बॉलिवूडमध्ये तिची जाण्याची इच्छा असली तरी मराठी ही मातृभाषा असल्यामुळे तिला मराठी सिनेसृष्टी सोडायची नाही.

प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांना ती रोल मॉडेल्स मानते आणि याविषयी बोलताना आकांक्षाने म्हटले की, “मला आयुष्यात खूप काही करायचंय असं जेव्हा मनात येतं तेव्हा मला प्रियांका चोप्राची आठवण येते. या इंडस्ट्रीतील प्रियाकांचा प्रवास पाहिला तर मी दंग होऊन जाते, तिच्याकडून प्रेरणा पण मिळते की ती कुठे होती आणि आता कुठे पोहचली. दीपिका पदुकोण पण माझी फेव्हरेट आहे, मी तिला फॉलो करते.”

Aakanksha Sakharkar 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like