संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. आपल्या पहिल्या सिनेमात दीप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक नुकताच आउट झाला आहे.

स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. या मालिकेत भैरवीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

एखाद्या खळखळ वाहत जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासारखा माणसाच्या आयुष्याचा प्रवास संकटातून मार्ग काढत, सुखाचा आनंद घेत पुढे जात असतानाच अचानक एखाद्या वळणावर अडसर येऊन काही काळ प्रवास थांबला तर? डोळे बंद, कुठली संवेदना नाही की आजूबाजूला काय चालू आहे याचीही जाणीव नाही. म्हणायला श्वास चालू आहे पण वाहत जाणारं पाणी पुढे न जाता एका जागी शांत थांबावं अगदी तसंच आयुष्य काही काळ शांत झाल्याचा अनुभव मी घेतला आणि त्यातून सहीसलामत बाहेरही पडलो.

मराठी सिनेसृष्टीला अभिमान वाटावा असा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट होत आहे. तो म्हणजे, आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर. या चित्रपटातील काही गाणी रिक्रिएटेड आहेत. तर काही ओरिजनल कम्पोजिशन्स आहेत. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तीरेखा डॉ. काशिनाथ घाणेकर यांची व्यक्तीरेखा रिफ्लेक्ट करणारं गाणं म्हणजे आला रे लाल्या बेफिकरा... चा कडक आवाज असलेला गायक नकाश अजीज याने त्याचा अनुभव मांडला आहे.

मराठी चित्रपटात नवनवीन चेहरे दिसू लागलेत. ही नवीन मंडळी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहतायेत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या कलाकारांमध्ये एक नवं नाव समाविष्ट झालेय अभिनेत्री दिप्ती धोत्रे हिचे. ‘डोंब’, ‘धारा ३०२’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकांनंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजी पार्क' आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मधून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ‘सर्वनाम’, ‘भोंगा’, भिरकीट’ या आगामी चित्रपटांमध्ये दिप्ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच आगामी ‘विठ्ठल’ चित्रपटातही तिच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Advertisement