सिनेमातील कलाकार कितीही मोठे असले तरी त्यांना नेहमीच काही ना काहीतरी नवीन शिकण्याची किंवा आपल्या गुणात आणखीन भर करण्यासाठी इच्छा असते. आपल्या अभिनय कौशल्यात ज्ञानाची अधिक भर घालण्यासाठी काही अभिनेते वर्कशॉपचा आधार घेतात. उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या जोडीने सुध्दा अलीकडेच काही खास वर्कशॉप जॉइंट केले होते. झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' हा चित्रपट ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यात उमेश आणि तेजश्री या दोघांची भूमिका आव्हानात्मक असल्यामुळे त्यांनी काही विशेष वर्कशॉप केले.

मित्र म्हणु की भाऊ.. की भावासारखा मित्र.. त्याच्याबद्दल जेवढं बोलले तेवढं कमीच आहे.. अरे हो हो हो मी कोणाबद्दल बोलतोय हे कळलं असेलचं ना... तो आहे मराठी फिल्म इंडस्ट्री मधील एक ग्रेट Idya... कळलं की नाही... काय राव तुम्ही.. त्याच्या लेखणीतुन.. स्त्रीभ्रुण हत्या, शेती विषयी जिव्हाळा.. गडसंवर्धनाची आस दिसते तो अभिनेता, लेखक, दिग्दर्शक असलेला हेमंत ढोमे..!!

"गुढीपाडवा म्हणजे आपले नवीन वर्ष. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत व्हावे यासाठी सर्वचजण तयारी करत असतात. गुढी खरं तर आनंदाचे प्रतिक असते. नवीन वर्षाची एक नवी सुरुवात आपण या दिवशी करत असतो . आनंदाची, प्रेमाची, नव्या सकारात्मत विचारांची आणि नव्या संकल्पांची गुढी आपण जर उभारली तर ख-या अर्थाने आपण गुढीपाडवा साजरा करतो, असं म्हणायला हरकत नाही." - ऋता दुर्गुळे

एक मुलगी हि घराची शोभा असते, स्त्री गुह्लक्ष्मी असते, बहिण भावाच्या मनगटावर असेलेली शान असते. समाजात, घरात स्त्रीचे स्थान खूप महत्वाचे आहे. एक स्त्री जितक्या कुशलतेने घर सांभाळते अगदी तितक्याच कुशलतेने ती काम, व्यवहार या देखील बाबी निपुण पणे पार पाडत असल्याचे दिसून येते. अनेक बाकीच्या क्षेत्रात देखील स्त्रीयांचा ठसा उमटलेला दिसून येतो. मग अश्या या स्त्रियांना जागतिक महिला दिवस निमित्ताने कलर्स मराठीवरील लाडक्या कलाकारांनी काही मोलाचे सल्ले दिले.

धुळवड म्हणजे रंगाचा खेळ, रंगाची उधळण करणा-या या उत्सवाचा नुकताच 'बबन' सिनेमातील संपूर्ण टीमने एका वेगळ्याच प्रकारे आनंद लुटला. होळीच्या मुहूर्तावर अहमदनगर येथील म्हसे गावात पार पडलेल्या या उत्सवामध्ये चिखलाची अनोखी 'धुळवड' साजरी करण्यात आली.

Advertisement