सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो. पण हेच कलाकार जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या वेगळ्या भूमिकेत दिसतात तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावतात. नेहमीच वेगळ्या धाटणीचे तसंच आशयघन सिनेमांच्या शोधात असणारे मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर हे दोन कलाकारही ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत.

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे बनत असतात. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळताना नरेश बिडकर यांनीही अशाच एका नावीन्यपूर्ण विषयावर सिनेमा बनवला आहे. ‘Once मोअर’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमात आशुतोष पत्की मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा चिरंजीव असलेल्या आशुतोषचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

मुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही वाटत असतं. आपल्या आई-वडीलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात, तेव्हा आई-वडीलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील खूप मोठं नाव. त्यांची मुलगी तृप्ती तोरडमल आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री बनली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाद्वारे तृ्प्ती अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

सुप्रसिध्द फिल्ममेकर संजय जाधव ह्यांचा १८ जुलैला वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशी संजय जाधव ह्यांना त्यांच्या मित्र-मंडळी आणि चाहत्यांकडून भरपूर गिफ्ट्स येतात. यंदा मात्र संजय जाधव ह्यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनाच एक आगळं गिफ्ट मिळालंय. संजय जाधव ह्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारी imsanjayjadhav.com ही वेबसाइट लाँच झाली आहे.

संजू चित्रपट सध्या हाऊसफूल होतोय. दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणा-या ह्या सिनेमातले रणबीर कपूरचे ८ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ. संजू चित्रपटात रणबीरसोबतच परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा ह्यांचा लूक खूलवण्यामागे सूध्दा सुरेंद्र-जितेंद्र ह्या भावांचा सिंहाचा वाटा आहे. ह्या दोन भावंडांनी संजूच्या मुख्य स्टारकास्टासाठी वीग डिझाइन केले आहेत.

'अ बॉटल फूल ऑफ होप' अशी टॅगलाईन असणारा 'पिप्सी' हा आशयघन सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' हा सिनेमा महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर आधारित आहे. त्यामुळे, सिनेमा वास्तवदर्शी होण्यासाठी 'पिप्सी' सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भात करण्यात आले आहे. यवतमाळ येथील अरणी तालुक्यात एन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्यामुळे, चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा तडाका सोसावा लागला होता.

Advertisement