"गुढीपाडवा म्हणजे आपले नवीन वर्ष. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत व्हावे यासाठी सर्वचजण तयारी करत असतात. गुढी खरं तर आनंदाचे प्रतिक असते. नवीन वर्षाची एक नवी सुरुवात आपण या दिवशी करत असतो . आनंदाची, प्रेमाची, नव्या सकारात्मत विचारांची आणि नव्या संकल्पांची गुढी आपण जर उभारली तर ख-या अर्थाने आपण गुढीपाडवा साजरा करतो, असं म्हणायला हरकत नाही." - ऋता दुर्गुळे

एक मुलगी हि घराची शोभा असते, स्त्री गुह्लक्ष्मी असते, बहिण भावाच्या मनगटावर असेलेली शान असते. समाजात, घरात स्त्रीचे स्थान खूप महत्वाचे आहे. एक स्त्री जितक्या कुशलतेने घर सांभाळते अगदी तितक्याच कुशलतेने ती काम, व्यवहार या देखील बाबी निपुण पणे पार पाडत असल्याचे दिसून येते. अनेक बाकीच्या क्षेत्रात देखील स्त्रीयांचा ठसा उमटलेला दिसून येतो. मग अश्या या स्त्रियांना जागतिक महिला दिवस निमित्ताने कलर्स मराठीवरील लाडक्या कलाकारांनी काही मोलाचे सल्ले दिले.

धुळवड म्हणजे रंगाचा खेळ, रंगाची उधळण करणा-या या उत्सवाचा नुकताच 'बबन' सिनेमातील संपूर्ण टीमने एका वेगळ्याच प्रकारे आनंद लुटला. होळीच्या मुहूर्तावर अहमदनगर येथील म्हसे गावात पार पडलेल्या या उत्सवामध्ये चिखलाची अनोखी 'धुळवड' साजरी करण्यात आली.

तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी मराठी निर्माते आणि दिग्दर्शक नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. दुसरीकडे मराठीत येणाऱ्या गाण्यांमध्ये ग्लॅमर आणि तरुणाई हळूहळू प्रवेश करते आहे. अशा वेळी चित्रपटातील गीतांबरोबरच युट्युबवरील म्युझिक सिंगलची संख्याही झपाट्याने वाढत आहे. या नव्या युगातील तरुणाईला पसंत पडतील अशीच काहीशी गाणी लिहीली जाणेही काळाची गरज बनली आहे. त्यामुळेच नव्या दमाचा गीतकार मिळण्यासाठी संगीतकार झटताना दिसत आहेत.

कविता ही वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटत असते. अनेकदा ही कविता फक्त आपल्या स्वत:पुरतीच असते तर कधी तिचा सामूहिक आविष्कार होत असतो. व्यवसायाने इव्हेंट मॅनेजर असलेल्या रेश्मा कारखानीस यांच्या मनातील अलवार भावनांना शब्दरूप लाभले आणि त्यातून साकार झाला ‘मी शून्य’ या शब्दांचा सुरेल प्रवास. त्यांच्या या कवितेचा प्रवास जाणून घेतल्यानंतर जीवनविषयक दृष्टीकोनाच सार त्यांनी आपल्यासमोर मांडला असल्याचे जाणवत राहते.

कोणतीही गोष्ट करावयाचे मनात असले, कि काहीतरी मार्ग हा सुचतोच! माणसाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, त्याची इच्छा मात्र पाहिजे, हे सूचित करणारे 'इच्छा तेथे मार्ग' ही म्हण आपल्या मराठीत प्रचलित आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट 'ख्वाडा' चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांना आगामी 'बबन' सिनेमादरम्यान याची चांगलीच प्रचीती आली. आपली शेतजमीन विकून 'ख्वाडा' सिनेमाचा डोलारा मोठ्या पडद्यावर सादर करणा-या भाऊरावांच्या डोक्यात आगामी 'बबन' सिनेमाची तयारी सुरु होती. मात्र आर्थिक तुटवड्यामुळे त्यांची दिग्दर्शनाची इच्छा अपूर्ण राहत होती. अशावेळी, 'ख्वाडा' सिनेमा पाहिलेल्या दोन प्रेक्षकांनी त्यांना खुशीने दिलेल्या १०० रुपयांच्या बक्षिसातून 'बबन' च्या निर्मितीचा मार्ग सापडला.

Advertisement