मध्यरात्री झोपेत असताना तुमच्या छाताडावर कधी भूत बसलय आणि त्यानं तुमचा श्वास कोंडलाय का..? एखाद्या उंच कड्यावर जोरात खाली पडलोय असं वाटून झोप मोडलीये का..? भीतीने गलितगात्र झाल्यावर, पळून जावसं वाटत असताना पायाचं बोट सुद्धा हलवता येत नाहीये का..? जोरात किंचाळावसं वाटत असताना तोंडातुन एक शब्दही फुटत नाहीये का..? आपण एकटे आहोत हे माहिती असुनही खोलीत नक्की कोणीतरी आहे असा भास होतोय का..?

२२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या उन्मत्त या मराठी थरारपटातून एक हँडसम मार्शल आर्टिस्ट पदार्पण करतोय, ज्याचं नाव आहे विकास बांगर.

अभिज्ञा भावे... मालिका जगतातील एक चमचमता तारा. अभिनय कौशल्याच्या जोरावर कुठल्याही भूमिकेला न्याय मिळवून देणारा हा चेहेरा अलीकडे घराघरांत अगदी रोजच पाहायला मिळतोय. 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील मायराची भूमिका साकारणारी अभिज्ञा सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतेय. भूमिका कुठलीही असो आपल्या खास अशा टचने ती प्रत्येक भूमिका आपलीशी करते हे तिचं वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे. अशाच एका आव्हानात्मक भूमिकेतून ती आपल्यासमोर येणार असून 'सूर सपाटा' या आगामी मराठी चित्रपटात तिचीही महत्त्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि प्रस्तुत जयंत लाडे निर्मित आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

एखादी व्यक्ती किती तयारीची आहे, हे जाणुन घेण्यासाठी ती व्यक्ती किती पाण्यात आहे असं विचारलं जातं. त्याच चालीवर एखाद्या चित्रपटाच्या बाबतीतही हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मिळेल का..?

झी युवावरील सूर राहू दे मधील प्रमुख भूमिका निभावणारा अभिनेता संग्राम साळवी आणि आम्ही दोघी मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हे दोघे गेल्यावर्षी लग्नबेडीत अडकले. खुशबू आणि संग्राम यांनी लग्न करून त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. ही दोघं म्हणजे चाहत्यांची आवडती जोडी आहे आणि ते नेहमीच या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करतात. व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजे प्रेमी युगुलांचा दिवस आणि नवीन लग्न झालेले खुशबू आणि संग्राम यांचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेन्टाईन्स डे पण तितकाच खास असेल यात शंकाच नाही.

स्वप्नं सगळेच पाहतात पण पूर्ण मात्र काहींचीच होतात. स्वप्नं प्रत्यक्षात उतरण्यासारखं सुख ते दुसरं कुठलं, हे त्याला कळलं ज्याने ते सर्वार्थानं जगलं. आपली ध्येय... आपली जिद्द... आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा दुर्दम्य आशावाद असतो तो स्वप्नांत. ही वेडी आशा आपल्याला पछाडून सोडते आणि मग सुरु होतो एक धाडसी प्रवास. खाचखळग्यांचा, वळणा-वळणांचा, एखाद्या मृगजळाप्रमाणे मग आपण त्या स्वप्नांमागे धावू लागतो. अनिकेत जगन्नाथ घाडगे या तरुण दिग्दर्शकानेही असाच काहीसा रोमांचकारी प्रवास अनुभवला तो 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Advertisement