एखाद्या खळखळ वाहत जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासारखा माणसाच्या आयुष्याचा प्रवास संकटातून मार्ग काढत, सुखाचा आनंद घेत पुढे जात असतानाच अचानक एखाद्या वळणावर अडसर येऊन काही काळ प्रवास थांबला तर? डोळे बंद, कुठली संवेदना नाही की आजूबाजूला काय चालू आहे याचीही जाणीव नाही. म्हणायला श्वास चालू आहे पण वाहत जाणारं पाणी पुढे न जाता एका जागी शांत थांबावं अगदी तसंच आयुष्य काही काळ शांत झाल्याचा अनुभव मी घेतला आणि त्यातून सहीसलामत बाहेरही पडलो.

मराठी सिनेसृष्टीला अभिमान वाटावा असा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट होत आहे. तो म्हणजे, आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर. या चित्रपटातील काही गाणी रिक्रिएटेड आहेत. तर काही ओरिजनल कम्पोजिशन्स आहेत. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तीरेखा डॉ. काशिनाथ घाणेकर यांची व्यक्तीरेखा रिफ्लेक्ट करणारं गाणं म्हणजे आला रे लाल्या बेफिकरा... चा कडक आवाज असलेला गायक नकाश अजीज याने त्याचा अनुभव मांडला आहे.

मराठी चित्रपटात नवनवीन चेहरे दिसू लागलेत. ही नवीन मंडळी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहतायेत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या कलाकारांमध्ये एक नवं नाव समाविष्ट झालेय अभिनेत्री दिप्ती धोत्रे हिचे. ‘डोंब’, ‘धारा ३०२’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकांनंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजी पार्क' आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मधून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ‘सर्वनाम’, ‘भोंगा’, भिरकीट’ या आगामी चित्रपटांमध्ये दिप्ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच आगामी ‘विठ्ठल’ चित्रपटातही तिच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

ज्याप्रमाणे जन्म देणाऱ्या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, त्याप्रमाणे मातूभूमीचे पण आपल्यावर खूप उपकार आहेत ही भावना मनात ठेवून देशाच्या रक्षणासाठी ऊन वारा पावसातही बॉर्डरवर आपले कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी माझा 'मराठी तारका' कार्यक्रम करण्याची संधी वेळोवेळी मला मिळाली.

गेल्या ८ वर्षांपासून रंगभूमीवर अभिनय आणि दिग्दर्शनाचा अनुभव असलेला क्षितीश दाते आगामी बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत क्षितीशने सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचे नटवर्य केशावारात दाते, दिग्दर्शनाचे गणपतराव बोडस पारितोषिक पटकावलेले आहे. तसेच योगेश सोमण दिग्दर्शित ‘माझ भिरभिर’ या चित्रपटातून तो चमकला आहे, तर ‘देवा शप्पथ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होता. अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘मुळशी पॅटर्न’हा चित्रपट येत्या शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

आवाजातील जरब, मोडेल पण वाकणार नाही हा बाणा आणि मराठी माणसांवर असलेलं प्रेम ह्या गोष्टीमुळे बाळासाहेब ठाकरे या नावाबद्दल मला खूपच कुतूहल होते, पण कधी प्रत्यक्ष भेट झाली न्हवती. 2007 मध्ये माझ्या 'मराठी तारका' कार्यक्रमाचा पहिला शो पुण्यात झाला आणि दुसरा मुंबईत. मुंबईत शो झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही वर्तमानपत्रांमधून त्याच्या बातम्या आणि फोटो छापून आले. 'सामना' पेपरमध्ये पहिल्याच पानावर मोठा फोटो आणि ठळक बातमी आली. ते पाहून मलाही आनंद झाला. तीन चार दिवसांनी मला 'मातोश्री' वरून फोन आला "साहेबांनी भेटायला बोलावलंय". मी जरा गोंधळून विचारलं" कोणत्या साहेबांनी बोलावलंय"? उत्तर मिळालं "बाळासाहेबांनी बोलवलंय".

Advertisement