आपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या लाखों तरूणींची धडकन बनलेला हँडसम हंक सुमेध मुदगळकर आता बॉलीवुडची ‘धकधक’ गर्ल माधुरी दिक्षीतच्या ‘बकेट लिस्ट’ ह्या सिनेमात दिसणार आहे. ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘मांजा’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या सुमेधसाठी ही त्याच्या करीयरची एक महत्वपूर्ण फिल्म असेल. माधुरीने ट्विटरवरून सुमेधची जी नुकतीच प्रशंसा केली आहे, त्यावरून तर तसेच समोर येतेय.

२० एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘शिकारी’ या मराठी चित्रपट रसिकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या अनेक वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एक म्हणजे चित्रपटात तीन आघाडीचे विनोदवीर आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ आणि इतर मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेले भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे आणि वैभव मांगले या चित्रपटांत महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

स्टार प्रवाहच्या 'शतदा प्रेम करावे' या लोकप्रिय मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्या ऐवजी ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे. अल्लड, अवखळ असलेली सायली ही भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे पहावं लागेल.

२० एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘शिकारी’ या मराठी चित्रपटाची रसिकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या अनेक वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एक म्हणजे या चित्रपटाचे सरप्राईज पॅकेज मृण्मयी देशपांडे , जी ह्या चित्रपटांत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कुंकू, टिकली आणि टॅटू ही चिन्हं स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहेत. मात्र आज स्त्री - पुरुष ही भेदरेषा पुसट झालीय. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सगळ्याच क्षेत्रात भरारी घेतायत. मग या चिन्हांमधूनच व्यक्त व्हायची आज खरंच गरज आहे का? आजच्या काळात या प्रतिकांचा नेमका अर्थ काय? ही प्रतिकं काय सांगू पाहतायत? कलर्स मराठी वाहिनीवर "कुंकू, टिकली आणि टॅटू" नावाची मालिका सुरु झालीय, त्यानिमित्ताने समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांचं कुंकू, टिकली, टॅटू या प्रतिकांबाबत काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न..

७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आपले आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे. या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने आरोग्याशी निगडीत आपले विचार मांडतो आणि जमेल तशी मदत करत असतो. ही मदत कोणत्याही स्वरुपाची असू शकते. जसे की एखादा सल्ला किंवा काळजी देखील मदत असू शकते. अशीच मदत अभिनेत्री ऋता दुर्गुळेने केली आहे.

Advertisement