संजू चित्रपट सध्या हाऊसफूल होतोय. दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणा-या ह्या सिनेमातले रणबीर कपूरचे ८ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ. संजू चित्रपटात रणबीरसोबतच परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा ह्यांचा लूक खूलवण्यामागे सूध्दा सुरेंद्र-जितेंद्र ह्या भावांचा सिंहाचा वाटा आहे. ह्या दोन भावंडांनी संजूच्या मुख्य स्टारकास्टासाठी वीग डिझाइन केले आहेत.
दुष्काळग्रस्त भागात पार पडले 'पिप्सी' चे शुटींग - पहा फोटोज्
'अ बॉटल फूल ऑफ होप' अशी टॅगलाईन असणारा 'पिप्सी' हा आशयघन सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' हा सिनेमा महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर आधारित आहे. त्यामुळे, सिनेमा वास्तवदर्शी होण्यासाठी 'पिप्सी' सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भात करण्यात आले आहे. यवतमाळ येथील अरणी तालुक्यात एन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्यामुळे, चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा तडाका सोसावा लागला होता.
'शरद केळकर' ची "यंग्राड" मध्ये महत्वाची भूमिका
६ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या ‘यंग्राड’ या बहुचर्चित मराठी चित्रपटात प्रख्यात बॉलिवूड कलाकार शरद केळकर याचीही महत्वाची भूमिका आहे. या अत्यंत गुणवान अशा कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विविधांगी भूमिकांनी स्वतःची अशी वेगळी छाप पाडली आहे. मोहन्जो दारो, हलचल, रॉकी हँडसम, सरदार गब्बर सिंग आणि बादशाहो या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका वटवल्या होत्या. मकरंद माने दिग्दर्शित ‘यंग्राड’मध्ये त्याची तशीच भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
"विद्याच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले" – सई ताम्हणकर
रविवारी झालेल्या सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन सशक्त अभिनेत्रींना एकत्र पाहण्याचा योग उपस्थितांना आला. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेत्री सई ताम्हणकर ह्या सोहळ्यामध्ये एकत्र आलेलं पाहणं, ह्या दोघींच्याही चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच होती.
Father's Day Special: 'बाबा, मला तुमची सेवा करू द्या' - हेमंत दयानंद ढोमे
माझे बाबा पोलीस खात्यात असल्याकरणामुळे, मी देखील पोलीस खात्यात किंवा शासकीय विभागात काम करावे असे त्यांना वाटत होते, मात्र, माझा कल अभिनयावर जास्त असल्याकारणामुळे त्यांचा विरोध हा साहजिकच होता ! परंतु, नाटक आणि सिनेमात कालानुक्रमे माझी झालेली यशस्वी वाटचाल पाहिल्यावर त्यांचा विरोध मावळला. मी लहानपणापासून त्यांना कडक आणि शिस्तबद्ध असे पाहिले आहे, पण तितकेच ते हळवेदेखील आहेत. मी कॉलेजमध्ये असताना गंभीररीत्या आजारी पडलो होतो, मला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यादरम्यान माझ्या हाताला लावलेली सलाईन निघाली होती. त्यावेळी माझा संपूर्ण हात आणि कपडे अक्षरशः रक्ताने माखले होते. तेव्हा माझ्या बाबांना पहिल्यांदाच मी हतबल झालेलं पाहिलं होतं. तो क्षण आजही आठवला कि माझे डोळे पाणावतात. फादर्स डे च्या निमित्ताने मी त्यांना इतकच सांगेन कि, सगळ्यांसाठी तुम्ही खूप केलंत , आता स्वतःसाठी वेळ काढा, मला तुमची सेवा करू द्या, आणि नेहमी आनंदी राहा. Happy Father's डे...
हेमंत दयानंद ढोमे.
Father's Day Special: बाबांना रडताना नाही पाहू शकत - श्रुती मराठे
माझे बाबा माझ्या फार जवळ आहेत. त्यांच्याशी मी सर्व गोष्टी शेअर करते. ते मला वडील म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून मार्गदर्शन करत असतात. अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या माझ्या निर्णयावर बाबांनी मला खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी इथे आहे. ते खूप स्ट्राँग आहेत, आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष अनुभवले, पण कधीच त्यांना रडताना मी पाहिले नाही. परंतु माझ्या लग्नात मला सासरी पाठवताना ते खुप रडले. दीड वर्षापूर्वी पुण्यात माझे लग्न झाले, त्यावेळी मी काही रडणार नाही असे मनोमन ठरवले होते, पण माझी सासरी रवानगी करताना माझ्या बाबांना अश्रू अनावर झाले नाही, त्यांना असे रडताना पाहून मग मी अक्षरशः कोसळलेच. योगायोगाने 'शुभ लग्न सावधान' हा माझा आगामी सिनेमादेखील लग्नसंस्थेवर आधारित आहे. त्यामुळे माझ्या लग्नाचा दिवस मला आठवतो, आणि त्यासोबत माझे भावूक झालेले बाबा डोळ्यासमोर येतात. त्यांच्या डोळ्यात मी कधीच अश्रू पाहू शकत नाही. त्यांना रडताना पाहिल्यावर आजही मी खूप अस्वस्थ होते.
श्रुती मराठे, अभिनेत्री.