'लागिरं झालं जी' फेम निखिल चव्हाण चा अभिनयक्षेत्राचा आलेख दिवसागणिक उंचावतच चालला आहे. चित्रपट, नाटक, मालिका, वेबसिरिजस चा एकामागून-एक धडाका लावणारा निखिल आत्ता एका लव्हस्टोरीचा हिरो म्हणून लवकरच आपल्या समोर येणार आहे. 'धोंडी चंप्या - एक प्रेमकथा' या आगामी चित्रपटात निखिल प्रेक्षकांना हसवणार आहे. प्रेमकथा म्हटलं तर हिरोईन आलीच. निखिल सोबत जोडी जमलीये सायली पाटीलची.

सिनेसृष्टीत डिजीटल प्रगती झाल्यामुळे आता भाषा, टेलिव्हिजन, चित्रपट यांच्यामध्ये काही अंतर राहिलेलं नाही. प्रादेशिक भाषेतील कलाकार आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. साऊथ आणि मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एण्ट्री करुन स्वत:ची ओळख तयार केली आहे. आणि आता हिंदीमध्ये आपली ओळख तयार करण्याची इच्छा मराठी अभिनेत्री आकांक्षा साखरकर हिची आहे. आकांक्षाने बऱ्याच मराठी चित्रपटांत आणि मालिकेत काम केलं आहे.

यातल्या राजे शब्दातल्या ‘रा’ मधे तलवार आणि ‘जे’ मधे झेंडा टाकून.. त्याचा भडक भगवा फॉन्ट करुन.. रिक्षाच्या मागे चिकटवलेला... कारवर टाकलेला.. फ्लेक्सवर छापलेला आपण नेहमी पाहतो.. पण खरं तर हेच वाक्य फ्लेक्सवर छापण्याऐवजी, ‘मनावर कोरलं जाईल’ तेंव्हा ती ख-या अर्थानं महाराजांना मानवंदना ठरेल..

‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल या व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील कुटुंबातील एक झाल्या आहेत. शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर हि खऱ्या आयुष्यात जर्मन भाषेत निपुण आहे पण मालिकेसाठी तिने सातारी भाषा शिकण्यासाठी देखील तितकीच मेहनत घेतली.

अगदीच नाही ना? खरं तर जगाच्या हृदयावर राज्य करणाऱ्या देवसेनेची अशी कुठल्यातरी विदृप माणसाशी तुलना होऊच शकत नाही. कारण एक मुर्तिमंत सौंदर्य. रेखीव चेहरा. मोहक रंगभुषा...! तर दुसरीकडे भिती आणि त्याहीपेक्षा तिटकारा वाटावा असा विदृप चेहरा.

Advertisement