Gossip
Typography

सोशल मिडीयावर अशा चर्चांना उधाण आलंय की ‘जर अनुष्का शर्मा धागा आहे तर रीना अगरवाल सुई आहे’ #AnushkaCopiedReena,‘अनुष्काने रीनाच्या लूकची कॉपी केली आहे’, ‘साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांनंतर बॉलिवूड आता मराठी चित्रपटांची पण कॉपी करत आहेत’ वैगरे वैगरे. असा ‘बोभाटा’ का बरं झाला असेल?

वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांचा ‘सुई धागा’ हा हिंदी सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. खरं तर प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला. मग ते कारण गंभीर असो किंवा मजेशीर... असो! या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनापासून सुरु झालेला अनुष्काच्या ‘ममता मिम्सचा सिलसिला’ हा प्रमोशनपर्यंत चालू होता. अनुष्काच्या मिम्सचे प्रकरण आता कुठे थंडावले असताना ऐन प्रदर्शनाच्या दिवशीच अनुष्काच्या ममता भूमिकेशी संबंधित सोशल मिडीयावर आणखी एक खळबळ उडाली. याचा अर्थ असा की या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. आता अशी चर्चा चालू आहे की अनुष्काने चक्क मराठी आणि हिंदी अभिनेत्री रीना अगरवालच्या ‘झाला बोभाटा’ या मराठी चित्रपटातील रीनाचा लूक कॉपी केला आहे.

आपल्या कामाची जेव्हा नक्कल होते तेव्हा ती आपल्या कामाची पोचपावतीच समजायची. अनुष्काने कॉपी केलेल्या लूकमुळे रीना अगरवालच्या कमाल अभिनयाने परिपूर्ण असलेला ‘झाला बोभाटा’चा लूक आणि एकंदरीत मराठी चित्रपटाचे कौतुक होतंय हे नक्की.

Anushka Sharma Copied Reena Aggarwal Look 01

Anushka Sharma Copied Reena Aggarwal Look 02

Anushka Sharma Copied Reena Aggarwal Look 03

Anushka Sharma Copied Reena Aggarwal Look 04

Anushka Sharma Copied Reena Aggarwal Look 05

Anushka Sharma Copied Reena Aggarwal Look 06

Anushka Sharma Copied Reena Aggarwal Look 07

3 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 3.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement