Interviews
Typography

Ghantaa is ready for release on this Friday, 14th October. The film is directed by the young debut director Shailesh Kale. Making a film is not easy and when you have a fresh idea which was never tried in Marathi film industry, it becomes more difficult. Shailesh talks about the journey of Ghantaa from the birth of the idea, story – script writing, casting, finding producers, presenters till the readiness of the film to be released. He also shares the fun moments on the sets.

Shailesh strongly believed to present the story in a comic way and says “Ghantaa is the story of every youngster who wants to become big.

Here are the excerpt from the Interview.

तरुणाईची भाषा बोलणारा, तरुणांनी तयार केलेला एक भन्नाट सिनेमा येत्या १४ ऑक्टोबरला रिलीज होतोय, त्याचं नाव आहे 'घंटा'. टीझर आणि ट्रेलरमधून या सिनेमाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहेच. ''प्रत्येक तरुणाला आयुष्यात काहीतरी बनायचं आहे. पण ते कसं बनायचं, हे माहीत नाही. 'घंटा'हा सिनेमा अशा प्रत्येक wanna-beचा सिनेमा आहे,''अशा शब्दांत 'घंटा'चा दिग्दर्शक शैलेश काळे त्याचं वर्णन करतो.

शैलेश काळेचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला सिनेमा. लालबागच्या चिवडा गल्लीत असलेल्या त्याच्या चिवड्याच्या दुकानात रंगलेल्या गप्पांमध्ये या चित्रपटाचा खऱ्या अर्थानं जन्म झाला. सुमित बोनकर आणि राहुल यशोद हे शैलेशचे जिगरी दोस्त. आपल्याला सिनेमा करायचाय, हे त्यांनी पक्कं ठरवलं होतं, मग तो कसा असावा, याच्यावरून चर्चा सुरू झाली. प्रेमकथा किंवा टिपिकल कुठलीही गोष्ट करायला नको, हे नक्की केलं. मग आजच्या तरुण पिढीच्या रोजच्या जगण्यातल्या गमतीजमती, चढउतार, याच्यावर सिनेमा करावा, असं ठरलं. त्यातून एक कथा जन्माला आली आणि पटकथाही त्यांनी तयार केली. अर्थात, स्क्रिप्ट तयार झालं, तरी चित्रपटाला निर्माता मिळत नव्हता.

Interview Ghantaa Director Shailesh Kale 02

''अनेक निर्मात्यांना स्क्रिप्ट ऐकवल्यानंतर असा चित्रपट मराठीत होऊ शकणार नाही, असाच सल्ला आम्हाला मिळाला. अशा वेळी राज बोडके, संकलक पंकज हुरणे हे मित्र आमच्या मदतीला आले. रोहित शेट्टी यांनी निर्मितीत सहभाग घेऊन आमच्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि त्यांच्यामुळेच सिनेमा पूर्ण होऊ शकला,''असा अनुभव शैलेश सांगतो.

अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी आणि आरोह वेलणकर असे तीन तरुण पिढीचे प्रतिनिधी असलेले कलाकार या चित्रपटात आहेत. सक्षमबरोबर शैलेशने आधी काम केलं होतं. अमेयला स्किप्ट ऐकवल्यावर त्यानं शैलेशवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि अनेक मोठ्या कलाकारांनी नाकारलेला हा सिनेमा तयार झाला. पुष्कर श्रोत्री, मुरली शर्मा, किशोर कदम, विजू खोटे, अभिजीत चव्हाण, असे अनेक कलाकारांचीही साथ मिळाल्याचं शैलेश आवर्जून सांगतो.

Interview Ghantaa Director Shailesh Kale 04

सिनेमा पूर्ण झाला, तरी तो प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचण्यासाठी त्याचं प्रेझेंटेशन आणि मार्केटिंग उत्तम प्रकारे व्हायला हवं. त्यासाठी आमचा मित्र ओम राऊत आम्हाला 'दशमी क्रिएशन्स'या टीव्ही क्षेत्रातील नावाजलेल्या प्रॉडक्शनचे निर्माते नितीन वैद्य आणि निनाद वैद्य यांच्याकडे घेऊन गेला. त्यांनाही हा सिनेमा आवडला आणि ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्यामुळेच आज एवढ्या चांगल्या पद्धतीने हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येत आहे, असंही शैलेश सांगतो.

मैत्री हे आपण निवडलेलं नातं असलं, तरी कधीकधी रक्ताच्या नात्याच्या माणसांपेक्षा जास्त ते जवळचे, जीवाला जीव देणारे असतात. या सिनेमा निर्मितीच्या बाबतीतही शैलेशला हाच अनुभव आला आहे आणि सिनेमातूनही त्यानं ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सेटवर दिग्दर्शक, कॅमेरामनपासून कलाकारांपर्यंत सगळेच तिशीच्या वयोगटातले असल्यामुळे धमाल होतीच, पण क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू असताना रात्री दोन वाजता शैलेशचा हात खांद्यापासून निखळला होता. त्यावेळी शूटिंग पूर्ण करणं गरजेचं होतं, म्हणून फक्त काही मिनिटं थांबून त्यानं तशाच अवस्थेत शूटिंग पूर्ण केलं आणि दुसऱ्या दिवशी तो हॉस्पिटलमध्ये admit झाला! या अशा पॅशनने साकारलेला 'घंटा'आता १४ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement