Interviews
Typography

आम्ही दोघी मालिकेत मधुराची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिवानी रांगोळे ची मुलाखत

आम्ही दोघी मधील तुझ्या मधुरा या पात्राशी तू किती रिलेट करते?

मधुराच पात्र हे खूपच पॉसिटीव्ह आणि बिनधास्त आहे. मला नेहमीच असे एनर्जेटिक कॅरेक्टर्स साकारायला आवडतात जे प्रेक्षकांचे मनोरंजन करतील आणि त्यांच्या मूड लाईट करतील. मधुराला स्वतःची मतं आहेत आणि ती खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे. मी खऱ्या आयुष्यात देखील मधुरा सारखीच आहे.

मधुरा या तुझ्या पात्राविषयी काय सांगशील?

मधुरा देशमुख ही इंटिरियर डिझायनर आहे. ती स्वतःच कुटुंब म्हणजे तिची मोठी बहीण मीरा आणि तिचा मामा यांच्याबद्दल अतिशय पझेसिव्ह आहे. तिला लग्नाची घाई नाही आहे तसेच तीअरेंज मॅरेजमध्ये विश्वास ठेवत नाही. ती खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करते आणि चालत आलेल्या रूढी व पारंपरिक गोष्टींबद्दल असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठीती निडरपणे प्रश्न विचारते.

Shivani Rangole Aamhi Doghi Serial 02

तुझं तुझ्या बहिणीसोबत म्हणजेच सहअभिनेत्री खुशबू सोबत ऑनस्क्रिन आणि ऑफ स्क्रिन बॉण्डिंग कसं आहे?

आम्ही दोघी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. पण शूटींगच्या पहिल्याच दिवशी एकमेकांना भेटून आम्हाला असं वाटलं कि आम्ही खूप आधी पासून एकमेकांना ओळखतो. आम्ही एकमेकींना स्वतःचे सीन्स सुधारण्यासाठी मदत करतो. जसं ऑनस्क्रीन मधुरा आणि मीराचं नातं आहे तसेच आम्ही ऑफस्क्रिन एकमेकींना सांभाळून घेतो. मधुरा नेहमीच तिच्या बहिणीला प्रोटेक्ट करते आणि तिला धाडसी बनायचा वेळोवेळी सल्ला देते. मधुराला अजिबात आवडत नाही जेव्हा तिच्या बहिणीला कोणी दुखावतं आणि तिची बहीण गप्पपणे सगळं सहन करते.

झी युवावरील आम्ही दोघी या मालिकेचा हिस्सा होऊन कसं वाटतंय?

मी याआधी देखील झी युवावरील लोकप्रिय ‘बन मस्का’ या मालिकेत मैत्रेयीचं पात्र साकारलं आहे. त्यामुळे या वाहिनीसोबत माझं असोसिएशन जुनं आहे आणि 'नवे पर्व युवा सर्व' याधोरणाला धरून ही वाहिनी युथफूल कॉन्टेन्टने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. अशा पॉसिटीव्ह टीम सोबत करताना मला खूप छान वाटतंय. आम्ही दोघी या मालिकेद्वारे उमेश नामजोशी सारख्या नामवंत दिग्दर्शकासोबत काम करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली ज्यांचं मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये मोलाचं योगदान आहे. सतीश पुळेकर, वर्षा दांदळे, विवेक सांगळे हे माझे सहकलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांच्या कोऑपरेटिव्ह स्वभावामुळे सेटवरील वातावरण नेहमीच हलकंफुलकं राहतं.

Aamhi Doghi Zee Yuva Serial 01

तू याआधी कधी 'मधुरा'सारखं पात्र साकारलं आहेस का? हे पात्र स्वीकरण्यामागे काही कारण?

मी याआधी देखील अशी पात्रं साकारली आहेत जी एनर्जेटिक आहेत. ज्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे. मधुराचं पात्रं माझ्यासाठी खूप खास आहे कारणमधुराचं पात्रं हे मी आतापर्यंत साकारलेल्या सर्व पात्रांमधील मॅच्युअर व्यक्तिरेखा आहे. माझा लुक देखील या मालिकेत खूप छान आणि रिफ्रेशिंग आहे.

ऑनस्क्रिन मधुरा आणि मीरा सारखंच तुझं तुझ्या खऱ्या भावंडांसोबत बॉण्डिंग आहे का?

मी एकुलती एक आहे पण मला नेहमीच असं वाटतं कि मला मीरा सारखी मोठी बहीण असावी जी माझे लाड करेल, कधी कधी मला चिडवेल आणि वेळ आल्यावर माझ्या चुकांसाठी मला ओरडेल. खऱ्या आयुष्यात नाही पण माझी मोठी बहीण असण्याची इच्छा 'आम्ही दोघी' या मालिकेने पूर्ण केली.

मधुराची भूमिका आव्हानात्मक वाटते का?

मधुराची स्वतःची काही तत्व आहेत. ती स्पष्टवक्ती आहे पण ती तितकीच भावुक आहे. हे दोन पैलू साकारणं आणि त्यांचा समतोल राखणं थोडं आव्हानात्मक आहे.

Aamhi Doghi Zee Yuva Serial Khushboo Shivani 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement