Interviews
Typography

आम्ही दोघी मालिकेत मीरा ची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्री खुशबू तावडे ची मुलाखत

मीरा या तुझ्या पात्राविषयी काय सांगशील?

मीरा सारखी शांत आणि सालस व्यक्तिरेखा साकारताना मला खूप छान वाटतंय. ती खूप लाजरी बुजरी आहे, ती जास्त बोलत नाही आणि प्रत्येक परिस्थितीनुसार ती स्वतःला अड्जस्ट करते. सशक्त कथानक असलेल्या मालिकेत काम करण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे.

'आम्ही दोघी' मधील तुझ्या मीरा या पात्राशी तू किती रिलेट करते?

मीराचं पात्र खऱ्या आयुष्यातील खुशबू सारखंच आहे. खऱ्या आयुष्यात मी स्वतः एक मोठी बहीण आहे ज्याची मला हे पात्र साकारताना खूप मदत झाली. मी मीराशी रिलेट करू शकते आणि तिची व्यक्तिरेखा खूप छानपणे समजू शकते.

तुझं तुझ्या बहिणीसोबत म्हणजेच सहभिनेत्री शिवानी सोबत ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन बॉण्डिंग कसं आहे?

हा प्रश्नाने माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणले. माझं आणि शिवानीचं ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन बॉण्डिंग खूपच छान आहे आणि आमचं ट्युनिंग खूप कमी वेळातचं जमलं. इतकी चांगली गट्टी जमल्यामुळे आम्हाला आमचं ऑनस्क्रीन बॉण्डिंग साकारण्यात खूप मोठी मदत झाली.

Aamhi Doghi Zee Yuva Serial Khushboo Shivani 01

झी युवावरील आम्ही दोघी या मालिकेचा हिस्सा होऊन कसं वाटतंय?

मी पहिल्यांदाच झी युवा या वाहिनीशी जोडली गेली आहे आणि खूप चांगल्याप्रकारे ही वाहिनी युथफूल कंसेप्ट असलेल्या मालिका सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यांचा हा प्रयत्न अगदीच स्तुत्य आहे. तसेच मी पहिल्यांदाच २ बहिणीचं नातं सांगणारी आणि अशी सुंदर संकल्पना जी आधी कोणीच हाताळली नाही अशा मालिकेत मालिकेत काम करतेय. ही कथा माझ्या खूप जवळची आहे.

तू याआधी कधी ' मीरा 'सारखं पात्र साकारलं आहेस का? हे पात्र स्वीकरण्यामागे काही कारण?

मी याआधी कधीच मीरा सारखी व्यक्तिरेखा साकारली नाही आहे आणि म्हणून मी लगेच ही व्यक्तिरेखा साकारायला होकार दिला. कलाकार म्हणून प्रत्येकालाच एक आव्हानात्मक भूमिका साकारायची इच्छा असते जरी ती व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यशाशी मिळतीजुळती असली तरीसुद्धा ती किती वेगळ्याप्रकारे साकारत येईल हे आव्हान कलाकारला पेलायचं असतं. मला खात्री आहे कि मी मीरा याव्यक्तिरेखेकडून एक कलाकार म्हणून पण खूप काही शिकेन.

मीराची भूमिका आव्हानात्मक वाटते का?

मीरा जास्त बोलत नाही आणि ती खूप लाजाळू आहे. तिला शब्दांविना भावना व्यक्त करायच्या असतात आणि हे खूप आव्हानात्मक आहे. ती आनंदी आणि लाजरी आहे. तेव्हा ही व्यक्तिरेखा साकारताना या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणं कलाकार म्हणून माझ्यासाठी आवश्यक आहे.

Aamhi Doghi Zee Yuva Serial 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement