Interviews
Typography

‘प्रेमा तुझा रंग कसा’ च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करत आहेत. अजिंक्य देव यांच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे. याचनिमित्ताने अजिंक्य देव यांच्याशी केलेली ही खास बातचित.

Prema Tujha Rang Kasa Star Pravah Host Ajinkya Deo 01

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या दुसऱ्या सीझनचं तुम्ही सूत्रसंचालन करत आहात त्याविषयी...
या कार्यक्रमाचा मुळ उद्देश समाजात जागृकता वाढवणं आहे असं मला वाटतं. समाजात घडणाऱ्या असंख्य गुन्ह्यांच्या गोष्टी आपण ऐकतो, वाचतो. पण त्या प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि अश्या गोष्टींपासून सावध राहण्याचं आवाहन ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या माध्यमातून करण्यात येतंय. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी खास आहे. शिवाय समाजामध्ये चांगला विचार रुजवण्याचा स्टार प्रवाह वाहिनी प्रयत्न करतेय. त्यांच्या या प्रवासात मला सामील होता आलं याचा आनंदही आहे.

Prema Tujha Rang Kasa Star Pravah Host Ajinkya Deo 02

खूप वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केलंय त्याविषयी काय वाटतं?
हो खरंय. हिंदी टेलिव्हिजनवर माझी नुकतीच एक सीरिज येऊन गेली. पण मराठी टेलिव्हिजनवर मी खूप दिवसांनंतर दिसणार आहे. मुळात एखादा शो मनापासून आवडला तरंच मी तो स्वीकारतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चं वेगळेपण मला भावलं. या आधी ‘स्टार प्रवाह’च्याच स्वप्नांच्या पलिकडलेमध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाह वाहिनीसोबत असणारं नातं या कार्यक्रमाच्यानिमित्ताने आणखी घट्ट होतंय याचा विशेष आनंद आहे.

Prema Tujha Rang Kasa Star Pravah Host Ajinkya Deo 05

‘प्रेमा तुझा रंग कसा’चं वेगळेपण काय सांगाल?
सध्या मराठीमध्ये गुन्ह्यांवर आधारित एकही कार्यक्रम नाहीय. शिवाय प्रत्येक दिवशी नवी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रत्येक एपिसोडला नवी गोष्ट आणि नवे कलाकार असल्यामुळेच प्रेक्षकांना सिनेमा पहात असल्याचा फील येईल. समाजात ज्या घटना घडतात त्याचंच प्रतिबिंब या कार्यक्रमामधून दाखवण्यात येतंय. माझ्यासाठी हा अनुभव समृद्ध करणारा आहे. मला महाराष्ट्रभरातून अभिनंदन करणारे बरेच फोन आले. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चे एपिसोड्स मित्रमंडळी आणि प्रेक्षकांना आवडत असल्याच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत.

Prema Tujha Rang Kasa Star Pravah Host Ajinkya Deo 04

तेव्हा पाहायला विसरु नका ‘प्रेमा तुझा रंग कसा’ चा दुसरा सीझन १७ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
- (समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या मालिकेद्वारे दाखवण्यात येणार्‍या कोणत्याही गुन्ह्याचे/वाईट प्रवृत्तीचे स्टार इंडिया/वाहिनी / निवेदक समर्थन करत नाहीत. तसेच अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा स्टार इंडिया/वाहिनी/ननिवेदक निषेध करतात.)

Prema Tujha Rang Kasa Star Pravah Host Ajinkya Deo 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement