Interviews
Typography

अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत, ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित आणि शेखर ढवळीकर लिखित ‘रेडीमिक्स’ हा कॉमेडी आणि रोमान्सचं मजेदार ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन असलेला चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. तरुणाईला भुरळ घालणाऱ्या या रोमांटिक चित्रपटाचं दिग्दर्शन युवा दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी केलं आहे. मालिकांच्या लिखाण – दिग्दर्शनात व्यस्त असलेल्या जालिंदर यांच्या शब्दात ‘रेडीमिक्स’ची गाथा.

रेडीमिक्स सिनेमांत असं काय आहे जे इतर सिनेमांत नाही?

कॉमेडी आणि रोमान्स यांचं काँबीनेशन असलेली एक सुंदर कथा प्रेक्षकांना ‘रेडीमिक्स’मध्ये पहायला मिळेल. आपल्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण जर आपल्याला एखादी छानशी गोष्ट पहायला मिळाली आणि सोबत वैभव, नेहा आणि प्रार्थना यांच्यासारखे मनोरंजन करणारे कलाकार असतील तर सिनेमा मस्त एन्जॉय करता येईल.

रेडीमिक्स कथेतला कोणता विशेष गुण भावाला?

लेखक शेखर ढवळीकर हे आमच्याकडे रेडीमिक्सची कथा घेऊन आले. मला त्यातलं सगळ्यात जास्त काही आवडलं असेल तर ते म्हणजे आजच्या काळातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्यात घडणारी एक छानशी गोष्ट.

Readymix Director Jalindar Kumbhar Prarthana Behere Neha Joshi 02

प्रार्थना – वैभव ही जोडी लोकप्रिय आहे म्हणून निवडली कि दुसरं कोणी डोळ्यासमोर येईनात म्हणून...

वैभव, प्रार्थना आणि नेहा हे तिघेही सिनेमातील व्यक्तिरेखांसारखेच वाटत असल्याने / व्यक्तिरेखांना अनुरूप असल्याने त्यांना निवडले.

सावित्रीच्या लेकी नंतर ‘रेडीमिक्स’चं धाडस करण्यासाठी जवळपास एक तप का?

आम्ही चांगली स्टोरी शोधत होतो. दरम्यान अनुबंध, लज्जा, कालाय तस्मय नमः, मधू इथे चंद्र तिथे आणि शेवटी 'का रे दुरावा' ही मी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली मालिका अशा टिव्हीवर चाललेल्या नवनवीन विषयांवर लेखन आणि दिग्दर्शन करण्यात मी व्यस्त होतो. तेही खूप अव्हानात्मकच काम होते. दरम्यात मला आणि निर्मात्यांना तशी चांगली गोष्ट मिळत न्हवती. शेखरने जेव्हा स्टोरी ऐकवली तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच ती एकदम आवडली.

नाते संबंधाकडे तुमच्या कलाकृतींचं झुकतं माप दिसतं यामागे काही विशेष आहे का?

उलट आहे खरं तर. कलाकृती कशीही असली तरी त्यातील व्यक्तिरेखांमधील नात्यांना मी जरा जास्तच एक्सप्लोर करतो. त्याने कथा एका वेगळ्याच पातळीवर येऊन पोहोचते.

रेडीमिक्स करताना मालिका आणि चित्रपट दोन्हीचा अनुभव मिक्स झालाय का?

नाही नाही, कामाच्या बाबतीत नेमकं काय सांगायचं आहे आणि कसं सांगायचं आहे याबाबतची स्पष्टता मला नक्की असते. मालिका आणि चित्रपट दोन्ही माध्यमातून खूप काही शिकता आलं जे दोन्ही माध्यमात काम करताना फायद्याचं ठरतं.

जालिंदरचं आवडत माध्यम कुठलं? आणि का?

सिनेमा. कारण माझ्या मनात असलेल्या कथा मला सिनेमातून सांगता येतात.

कॉलेजातून नुकतंच बाहेर पडून नोकरी धंदा करणऱ्या तरुणाईकडे तुम्ही कसं पाहताय?

कॉलेजमधून बाहेर पडलेली आजची मुलं ही खूप सॉर्टेड आहेत. नक्की काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे याबाबतीतला रोडमॅप त्यांच्याकडे तयार असतो. त्यांना मदत करणं हे अनुभवी आणि वयस्कर नागरिकांचं काम आहे. पण त्यांना घाबरवण्यात येतं. नाऊमेद करण्यात येतं हे चूक आहे.

चित्रपटाच्या एकूण दर्जा आणि सौंदर्य वेगळा आहे, ते आणण्यासाठी विशेष काय करावं लागलं?

चित्रपटातील फ्रेशनेस, ताजेपणा दिसायला हवा, अनुभवायला हवा म्हणून प्रयत्न करण्यात आला. गायक तरुण आणि नवीन घेण्यात आले, म्युझिक त्या पद्धतीने करण्यात आलं. कॅमेरा, लाईट्स, कपडे आणि मेकअप, लोकेशन्स या सगळ्यात बाबतीत ताजेपणा जपायचा प्रयत्न करण्यात आला.

4 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement