माणसाला अनेक छंद असतात आणि ते जोपासणाऱ्या व्यक्ती त्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यापैकी कुणी आपल्या आवडत्या कलाकाराला किंवा खेळाडूला पहाण्यासाठी दूरवरचा प्रवास देखील करतात. परंतु छंद नसला तरी चित्रपटाचा ट्रेलर बघून तो पाहण्यासाठी चक्क दीड हजार किलोमीटरचा प्रवास करणे ही दुर्मिळ घटना ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या निमित्ताने घडली आहे.

Zee5 वर नुकतीच आलेली ‘डेट विथ सई’ ही वेब सिरीज वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय बनली आहे. ग्लॅमरस अदा असलेली आणि कमालीचा अभिनय करणारी सई ताम्हणकरने तिच्या या पहिल्या वेब सिरीजमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सई जरी या वेब सिरीजचा प्रमुख चेहरा असली तरी देखील या वेब सिरीजमध्ये आणखी एका चेहऱ्याने जबरदस्त काम केले आहे आणि ती व्यक्ती म्हणजे अभिनेता रोहित कोकाटे. रोहितने ‘डेट विथ सई’मध्ये उत्तम काम केलंय आणि खरोखर ज्याची भिती वाटेल असं उत्तम काम रोहितने केलंय हे स्वत: सईने एका मुलाखतीत म्हटले होते.

मराठीत दिवसागणिक नवनवीन आशयघन आणि सामाजिक विषयांवरील सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमांमधून अनेक लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांची फौज मराठी चित्रपटसृष्टीला मिळत आहे. लवकरच अशाच एका ताज्या दमाच्या मंडळींचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव ‘एक होतं पाणी’ असं आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम जोरदार सुरू आहे.

अभिनेत्री सैयामी खेर ने हिंदी चित्रपटसृष्टित दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट मिर्ज़ियाँ मधून धमाकेदार पदार्पण केले होते. ह्या चित्रपटानंतर ही हुन्नरी अभिनेत्री रितेश देशमुख अभिनीत आगामी मराठी चित्रपट "माऊली" मधून मराठी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टित पदार्पणास सज्ज झाली आहे.

असं म्हणतात की, माणूस जन्माला येण्या आधीपासून त्याचा संघर्ष सुरु झालेला असतो. संघर्ष हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. या संघर्षात जो जिद्द दाखवतो, धीराने उभा राहतो आणि स्वतःला घडवतो तोच नवा इतिहास घडवू शकतो. ‘पाटील’ चित्रपटाच्या रुपात एका प्रेरणादायी संघर्षकथेने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. प्रेक्षक आग्रहास्तव ‘पाटील’ येत्या २१ डिसेंबरला पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. निर्मित ‘पाटील संघर्ष... प्रेम आणि अस्तित्वाचा’ या चित्रपटात शिवाजी पाटील याचा संघर्षमय प्रवास मांडला आहे.

Advertisement