Latest News
Typography

अभिनय कट्ट्याच्या ३५० क्रमांकापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात अनेक उतार चढाव अनुभवयाला मिळाले कट्टयावर अनेक कलाकार घडत असताना कट्ट्याने मात्र सतत कलाकारांना आपल्यात सामावून घेतलं. एकपात्री , द्विपात्री, पथनाट्य , एकांकिका , प्रायोगिक नाटक , गायन , अभिवाचन ,नृत्य ,काव्यवाचन , नव्यानं प्रदर्शित होणाऱ्या नाटक व चित्रपटाचा परिसंवाद , विविध स्पर्धा , भजन अशा विविध कलाविष्कारांमधून प्रत्येक कलाकाराला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. प्रत्येक सण व उत्सव अभिनय कट्ट्यावर आजपर्यंत साजरे करण्यात आले. दहीहंडी , आषाढी एकादशी , रक्षाबंधन , दिवाळी पहाट , होळी असे अनेक सण साजरे करण्यात आले. आपल्या प्रत्येक सादरीकरणातून अभिनय कट्ट्याच्या कलाकारांसोबत व कट्ट्यासोबत रसिक मायबापांचे ऋणानुबंध अशा पद्धतीने जोडले गेले कि प्रत्येक रसिक प्रेक्षक हा अभिनय कट्ट्याचा कुटुंबीय कधी झाला हे कळलंच नाही. अशा आपल्या कट्ट्यावर ठाण्यासोबत महाराष्ट्रातील असंख्य रसिकांनी, कलाकारांनी भरभरून प्रेम केलं ५०, १००, १५० ,२०० , २५० ,३०० असे अतिशय महत्वाचे टप्पे गाठत असतानाच २९ ऑगस्ट २०१७ रोजी आलेल्या पावसाच्या प्रलयानंतर अशा काही प्रतिक्रिया येऊ लागल्या कि आता अभिनय कट्टा पुन्हा उभा रहाणार नाही परंतु या महासंकटावर मात करीत अभिनय कट्ट्याच्या सर्वच हितचिंतकांच्या सहकार्याने पुन्हा उभं रहाण्याचा प्रयत्न सुरु केला व याच प्रयत्नात कट्टा ३५० क्रमांकाचा महत्वाचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज झाला. ३५० व्या ऐतिहासिक अभिनय कट्ट्यावर बालदिन साजरा करण्यात आला.या कट्ट्यावर कट्ट्याच्या बालकलाकारंचे नृत्य,कट्ट्याच्या तरुण कलाकारांनी बालकलाकारांसाठी सादार केलेले बालगीत, एकपात्री, स्कीट, ”व्यक्ती आणि वल्ली” या बालनाट्य आणि “हम्पी” चित्रपटाच्या चामुसोबातचा परीसंवाद अशा विविधढंगी सादरीकरणांनी कट्टा बहरला.

प्रथेप्रमाणे प्रार्थनेने कट्ट्याची सुरुवात झाली. बालदिन विशेष असलेल्या या कट्ट्यावर सगळच जरा हटके होतं. म्हणून या कट्ट्याचे दीपप्रज्वलन लहान मुलांच्या हस्ते पार पडले आणि ३५० व्या ऐतिहासिक कट्ट्याला सुरुवात झाली. प्रथमतः अभिनय कट्टा संस्कार शास्त्रात शिकत असलेल्या बालकलाकारांनी एकपात्री सादर केल्या. ज्यामध्ये सई कदम हिने “खेडेगावातलं जीवन”, प्रथम नाईक याने “बोन्साय”,आर्य माळवे याने “मॉल अँण्ड मॉम”, प्रांजल धारला हिने “माझा स्वयंपाक”, अखिलेश जाधव याने”बस स्टँड”, श्रेयस साळुंखे याने “सलीम पंक्चरवाला”,निमिष भगत याने “वृक्षारोपण”,चिन्मय मौर्ये याने “गडावर चढाई”, वैष्णवी चेवूलकर हिने “मी आणि परी”,पूर्वा तटकरे हिने “आईस्क्रीमचा गोळा”,सानवी भोसले हिने “मी हरवले होते”,निमिष पिंपरकर याने “मी घर रंगवतो”, अद्वैत मापगांवकर याने “मॉर्निंग वॉक” अशा विविधढंगी एकपात्री दमदारपणे सादर केल्या आणि विशेष म्हणजे या साऱ्या एकपात्रींचे निवेदनही बालकलाकारांनीच केले.यानंतर बालदिनविशेष कार्यक्रमात अभिनय कट्ट्याला भेट दिली ती “व्यक्ती आणि वल्ली” या बालनाट्याच्या चमूने.यावेळी या नाटकाचे दिग्दर्शक मंदार टिल्लू ,सहनिर्माता बाळकृष्ण ओडेकर,निर्मिती सूत्रधार सुनील जोशी यांच्यासह या नाटकातील सर्वच बालकलाकारानी उपस्थिती दर्शविली. पुलंच्या बहुमुल्य साहित्याचे संस्कार आपल्या पुढच्या पिढ्यांवरही व्हावे याकरिता हे नाटक बालनाट्यच्या स्वरुपात निर्माण करण्यात आले आहे,असे दिग्दर्शक मंदार टिल्लू प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले.

यानंतर अभिनय कट्ट्याचा कलाकार परेश दळवी व त्याच्या सहकलाकार मंडळींनी “झक्कास गावची भकास शाळा” ह्या सादारीकरणाद्वारे प्रेक्षकांना एका धम्माल विनोदी शाळेची भेट घालून दिली.यासोबतच हसवता हसवता एक उपदेशपर संदेशहि दिला.यानंतर या बालकलाकाराने “श्रेया वरे ”हे गीत सादर केले.

३५० व्या ऐतिहासिक अभिनय कट्ट्याला शुभेच्छा देण्यासाठी “हम्पी” चित्रपटाची संपूर्ण टीम.

यानंतर वेळ आली होती ती काही दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या “हंपी” या चित्रपटाच्याचा चमुशी संवाद साधण्याची.यावेळी या चित्रपटात भूमिका साकारणारे ललित प्रभाकर,प्राजक्ता माळी आणि सोनाली कुलकर्णी हे कलाकार उपस्थित होते.कलाकारांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांबद्दल आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या प्रसंगांबद्दल प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. “हंपी” हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबर पासून प्रदर्शित होणार असून चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.यानंतर दुबई येथे आयोजित केलेल्या दुबई सिटी स्विम ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप २०१७ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून या स्पर्धेत २५० मीटर स्पर्धेत शुभम पवार याने सुवर्णपदक पटकाविले, तर वसई विरार महानगरपालिकेचे अतिरिक्‌त आयुकत संजय हेरवाडे यांनी रजत पदक प्राप्त केले. ५०० मीटर स्पर्धेत्‍ क्षितीज हेरवाडे यांनी रजतपदक पटकाविले तर ईशा शिंदे सातवा क्रमांक व तनिष्का हेरवाडे हिने नववा क्रमांक मिळविला. १ कि.मी स्पर्धेत आशय दगडे याने कांस्यपदक तर विजय ओजाळे याने सातवा क्रमांक पटकविला. २.५ कि.मी स्पर्धेत सानिका तापकीर, जय एकबोटे यांनी चौथा क्रमांक, ओम जोंधले याने सातवा क्रमांक, पृथ्वीराज कांबळे यांनी आठवा तर शुभम पवार याने नववा क्रमांक पटकाविला. स्वप्नील गोखले यांनी या स्पर्धेत टीम लिडर म्हणून काम पाहिले तर या सर्व विजेत्यांना कैलास आखाडे , नरेंद्र पवार व अनिल दगडे यांचे मार्गदर्शन लाभले.अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ठाण्यातील जलतरणपट्टूंचा सत्कार किरण नाकती यांनी केला.

मग कट्ट्याच्या तरुण कलाकारांनी लहान होत “सांग सांग भोलानाथ” या बालगीतावर नृत्य सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.ज्यात वैभव जाधव,वैभवी वंजारे,वीणा छत्रे,अतिश जगताप,शिल्पा लाडवंते, रुक्मिणी कदम,शिवानी देशमुख,संदीप पाटील,न्यूतन लंके या कलाकारांचा समावेश होता.यानंतर कट्ट्याच्या बालकलाकारांनी “बाय गो बाय गो” या गाण्यावर नृत्य सादर केले आणि आपल्या एनर्जीचा प्रत्यय सार्यांना करवून दिला. शेवटी कट्ट्याचा कलाकार कल्पेश डुकरे याने लिहिलेल्या पत्राद्वारे साक्षात स्वतः अभिनय कट्टयाने प्रेक्षकांशी संवाद साधला आणि साऱ्यांना भावूक केले.शेवटी किरण नाकती यांनी ३५० व्या कट्ट्यावर उपस्थित सर्व मान्यवरांचे कट्ट्याचे सन्मानचिन्ह देवून सत्कार केला आणि प्रेक्षकांनि ३५० व्या कट्ट्याला प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले व या ३५० व्या ऐतिहासिक कट्ट्याची सांगता झाली.या या संपूर्ण कट्ट्याचे सूत्रसंचालन संकेत देशपांडे यांनी केले तर तांत्रिकबाजू हितेश नेमाडे आणि प्रणव दळवी या कलाकारांनी सांभाळली.

Photos

350th Abhinay Katta 01

350th Abhinay Katta 02

350th Abhinay Katta 03

350th Abhinay Katta 04

350th Abhinay Katta 05

350th Abhinay Katta 06

350th Abhinay Katta 07

350th Abhinay Katta 08

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement